Social Worker Anjali Damania Press Conference : आज सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांची (Anjali Damania) पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्यांनी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर गंभीर आरोप केलेत. पत्रकार परिषदेत बोलताना दमानिया म्हणाल्या की, एक कृषीमंत्री शेतकऱ्यांचे पैसे कसे खातो, हे मी पुराव्यानिशी सांगणार असल्याचे सांगत वर्षभराच्या काळात धनंजय मुंडेंनी 275 कोटींचे पाच घोटाळे केल्याचा गंभीर आरोपही दमानिया यांनी धनंजय मुंडेंवर केला.
यावेळी थेट पुरावे दाखवत अंजली दमानिया यांनी महायुतीच्या नेत्यांवर वार केलाय. नॅनो युरिया, नॅनो डीपीएच्या खरेदीत कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली जे टेंडर काढलं गेलं त्यात एक बॉटल 220 रूपयांना घेतली, तिची किंमत 92 रूपये होती. हा घोटाळा 88 कोटींचा आहे. बॅटरी स्प्रेयरवर बोलताना अंजली दमानिया म्हणाल्या की, तो आताच्या घटकेला 2400 रूपयाला घेतला जातोय, तर 2900 रूपयांना विकला जातोय. याचं टेंडर कृषीमंत्र्यांनी काढलं, ते 3600 रूपयांना आहे. आपले तत्कालिन कृषीमंत्री यांनी किती पटीने गोष्टी खरेदी केल्या ते पहा. 2 लाख 36 स्पेअर बॅटरी खरेदी केल्या 3000 रूपयाची एक बॅटरी आहे. प्रत्येकी 1275 रूपये जास्त किमतीने हे खरेदी केले.
सरकारने डीबीटी स्किम काढली होती. या योजना लाभार्थींपर्यंत पोहोचत नाही. त्यात मोठा भ्रष्टाचार होतोय. म्हणून 2016 मध्ये महाराष्ट्र शासनाने एक जीआर काढला होता. 2017 आणि 2018 मध्ये जीआर आले होते. 12 मार्च 2024 मध्ये एक जीआर आला. त्यात कृषी आयुक्ताला नियंत्रण आयुक्त करण्यात आल्याचं सांगण्यात आलं. 15 मार्चला गोडाम म्हणाले की, हे चुकीचं होतंय. याची माहिती पूर्ण मंत्र्यांना देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
मी सुरेश धस यांचा पीए…असं सांगत उकळले सरकारी अधिकाऱ्यांकडून पैसे, धाराशिवमधील धक्कादायक घटना
थेट शेतकऱ्यांच्या खात्यात ते पैसे द्यायला हवेत, असा याचा सरळ अर्थ होतो. यावर धनंजय मुंडे म्हणतात, असं करायला नको. मुख्यमंत्र्यांनी त्यांना परवानगी दिली असल्याचं सांगतात. मुख्यमंत्र्यांकडे या गोष्टींची अथॉरिटी नसते. रात्रीच्या वेळी मुंडे अजित पवारांकडे जातात. त्यांना भेटतात मग ते मुख्यमंत्र्यांकडे जातात. धनंजय मुंडेंनी अजित पवार, एकनाथ शिंदेंची सही मिळवून स्किम राबवली, असा आरोप दमानिया यांनी केलाय. तेव्हा मुख्यमंत्री शिंदे होते, असं वक्तव्य अंजली दमानिया यांनी केलंय. यात पाच गोष्टी होत्या, नॅनो युरिया, असा टोला त्यांनी लगावला आहे.
Video : भाजप एकनाथ शिंदेंचाही पक्ष फोडणार? मुनगंटीवार भाजपवरच… पाहा पूर्ण सविस्तर मुलाखत
कॅाटन कलेक्टींग बॅग 577 रूपयाला मिळते. अश्या 342 कोटींचे हे टेंडर होते. त्यामध्ये 160 कोटी रूपये सरळ सरळ गेले, असा दावा दमानिया यांनी केलाय. ते एकच वर्ष त्या पदावर होते. केवळ एकाच वर्षात अफाट पैसा शेतकऱ्यांचा खाल्ला असेल, तर अशा लोकांना त्या पदावर ठेवण्याची गरज आहे का? आता देखील मुख्यमंत्र्यांनी या विषयाकडे गंभीरपणे पाहावे, असं अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे. पुरावे दाखवत अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्यावर पत्रकार परिषदेमध्ये गंभीर आरोप केले आहेत.