Siddharam Mhetre Will Join Shivsena : राज्यात महायुतीचं (Mahayuti) सरकार आल्यापासून महायुतीमध्ये नेत्यांचं इनकमिंग वाढलंय. अनेक बडे नेते महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) सोडून महायुतीमध्ये सहभागी होत आहे. आता सोलापूरमध्ये काँग्रेसला (Congress) मोठा धक्का बसलाय. कारण, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे (Siddharam Mhetre) यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला.
खळबळजनक! पुणे रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवणार, पोलिसांच्या कंट्रोल रूमला धमकीचा फोन
अनेक वर्षांपासून सिद्धाराम म्हेत्रे काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ होते. मात्र, मागील काही दिवसांपासून म्हेत्रे हे शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे. अशाच म्हेत्रे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. या बैठकीला महेश साठे, महिला आघाडीच्या अनिता माळगे यांचीही उपस्थिती होती. त्याच बैठकीत म्हेत्रे यांनी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतल्याचं बोलल्या जातं.
शिंदेची भेट घेतल्यानंतर म्हेत्रे यांनी आज सोलापूर येथील रेवणसिद्धेश्वर सांस्कृतिक भवनात बैठक घेत शक्तीप्रदर्शन केलं. शिवसेना जिल्हाप्रमुख महेश साठेंच्या उपस्थितीत म्हेत्रे यांचा शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय निश्चित करण्यात आला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हेत्रे यांचा पक्षप्रवेश शनिवार (३१ मे) रोजी अक्कलकोट येथे एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार आहे.
सिंधु नदीचा पाणी प्रश्न चिघळला, आंदोलनाला हिंसक वळण, गृहमंत्र्यांचं घर पेटवलं
म्हेत्रे काय म्हणाले?
माध्यमांशी बोलताना सिद्धाराम म्हेत्रे यांनी सांगिलतं की, आम्ही काही नाराज नाही. कॉंग्रेसने आम्हाला भरपूर दिलं आहे. मात्र, 2009 पासून कॉंग्रेसकडून आम्हाला जी ताकद मिळायला पाहिजे होती, ती मिळत गेली नाही. आमच्या कार्यकर्त्यांनाही त्रास होत होता. शेवटी कार्यकर्त्यांचा आग्रहास्तव शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. एकनाथ शिंदे चांगला माणूस आहे, कामाला पक्का आहे, शिंदे गटात प्रवेश करा असं कार्यकर्त्यांनी सांगितलं. हा माझा एकट्याचा निर्णय नाही. मी आज सर्वांशी चर्चा करून हा निर्णय घेतला, असं म्हेत्रे म्हणाले. तसंच दुश्मने दोस्ती हर हालात में अच्छी होती है… आणि एवढं करूनही कार्यकर्त्याना होत असलेला त्रास कमी झाला नाही तर पुन्हा संघर्ष करणार, असंही ते म्हणाले.
दरम्यान, सिद्धाराम म्हेत्रे हे कॉंग्रेसचे माजी आमदार आणि गृहराज्यमंत्री राहिले आहेत. ते एक-दोनवेळा नव्हे तर तब्बल चारवेळा अक्कलकोट मतदारसंघातून आमदार राहिले आहेत. एक वेळा त्यांनी राज्याचे गृहराज्यमंत्री आणि ग्रामीण विकास राज्यमंत्री म्हणूनही काम पाहिले. ते शिंदे गटात सामील झाले तर काँग्रेस जिल्ह्यातून खिळखिळी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
यापूर्वी संग्राम थोपटे, रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेसची साथ सोडली आहे. अनेक काँग्रेस नेते आणि पदाधिकारी पक्षाला सोडचिठ्ठी देत असल्याचं पाहायला मिळतंय. आता म्हेत्रे यांच्यासारख्या बड्या नेताही काँग्रेसचा हात सोडणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळं पक्षाला लागणारी गळती कॉंग्रेस कसं थांबवणार, हेच पाहणं महत्वाचं आहे.