Raj Thackeray News : देशात सध्या लोकसभा निवडणुकीचं (Loksabha Election) वातावरण तापलंय. सर्वच पक्षांकडून सत्ता खेचण्यासाठी कंबर कसण्यात येत आहे. अशातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (MNS) कोणती भूमिका असेल याबाबत अनेक शंकाकुशंका होत्या. अखेर राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी काल जाहीर सभेत महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. अशात चर्चा सुरु आहे नेमकी बोलणी फिस्कटली का? तर मनसेचा महायुतीतील प्रवेश कमळ चिन्हामुळे नाहीतर धनुष्यबाणामुळे फिस्कटल्याची माहिती समोर आली आहे. राज ठाकरे यांच्या इंजिनला ब्रेक कमळामुळे नाही तर धनुष्यबाणामुळे लागला असल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली आहे. त्यामुळेच मनसेचा महायुतीत प्रवेश झाला नसल्याचं सांगण्यात येत आहे.
सांगलीसाठी शेवटपर्यंत प्रयत्न करणार : मॅच सोडायला विश्वजीत कदम अन् विशाल पाटलांचा नकार
मागील अनेक दिवसांपासून एकनाथ शिंदेंकडून एकत्र येण्याबाबतचं सांगण्यात येत होतं. देवेंद्र फडणवीसांकडूनही अनेकदा संदेश येत होते. मात्र, एकनाथ शिंदेंकडून मनसेच्या उमेदवारांनी धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवावी,असा प्रस्तावर होता. मात्र, इंजिन सोडून आपण दुसऱ्या कोणत्याही चिन्हावर निवडणूक लढणार नसल्याचा पवित्रा राज ठाकरे यांनी घेतला होता. याबाबत राज ठाकरे यांनी कालच्या जाहीर सभेत बोलताना स्पष्ट केलं आहे. तर दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी आम्ही असा कोणताही प्रस्ताव दिला नसल्याचं जाहीर केलं आहे.
सांगलीत ‘पिक्चर अभी बाकी है’ : विशाल पाटलांच्या बंधूंनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट
राज ठाकरे यांनी अमित शाहांची भेट घेतली. ही राजकीय भेट असल्याचं सांगण्यात येत होतं. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये निवडणुकीबाबत चर्चा झाली. या चर्चेदरम्यान, तुम्ही आमच्या चिन्हावर निवडणूक लढवा, असं सांगण्यात आलं होतं. मात्र, माझ्या पक्षाचं चिन्ह रेल्वे इंजिन असून ते कार्यर्त्यांनी कमावलेलं आहे, ते आयात केलेलं नाही. चिन्हाबाबत तडजोड होऊ शकत नाही, असं राज ठाकरे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं आहे. जागावाटपावर चर्चा झाली.. तू दोन घे.. तीन घे.. मला ही दे.. असं मला जमत नसल्याचंही राज ठाकरेंनी थेट सांगून टाकलं आहे.
दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेना ‘भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी’च्या महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत आहे. आम्हाला राज्यसभा नको, बाकीच्या वाटाघाटी नको हा पाठिंबा फक्त नि फक्त नरेंद्र मोदींसाठी आहे, असे राज ठाकरे यांनी जाहीर केले. पण याचबरोबर मनसे सैनिकांना राज ठाकरे यांनी एक आदेशही दिला आहे. माझ्या सर्व महाराष्ट्र सैनिकांना हे सांगायचं आहे की, विधानसभेच्या तयारीला लागा.. जोरात विधानसभेच्या तयारीला लागा.. पुढच्या गोष्टी पुढे.. आता कसलाही विचार न करता आपण पक्ष बांधणीचा विचार केला पाहिजे.