Download App

दक्षिण मुंबई स्वतःकडे ठेवण्यात शिंदेंना यश; यामिनी जाधव यांना उमेदवारी जाहीर..

दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ स्वतःकडे ठेवण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना यश आलं असून यामिनी जाधव यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलीयं.

Image Credit: Letsupp

South Mumbai Loksabha : अखेर महायुतीकडून मुंबईतील जागावाटपाचा तिढा सुटला असल्याचं दिसून येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ (South Mumbai Loksabha) स्वत:कडे ठेवण्यात यश आलं आहे. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून यामिनी जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिवसेना शिंदे गटाकडून धनुष्यबाण चिन्हावर यामिनी जाधव रिंगणात उतरणार आहेत. त्यामुळे आता महायुतीकडून यामिनी जाधवांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीचे अरविंद सावंत यांच्यासोबत त्यांची लढत होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

लोकसभा निवडणुक जाहीर होऊन अनेक दिवस उलटल्यानंतही महायुतीत अद्याप जागावाटपावरुन रस्सीखेच सुरु असल्याचं दिसून येत होतं. आत्तापर्यंत भाजपने 27 शिवसेना शिंदे गट 10 तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने 5 जागांवर उमेदवार घोषित केलेले आहेत. तर नाशिक आणि मुंबईच्या जागांच्या अद्याप शिक्कामोर्तब झालेले नव्हते. अखेर दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाची जागा एकनाथ शिंदे यांनीच मिळवली असून यामिनी जाधव यांना उमेदवारीही जाहीर केली आहे.

मोदींनी माढ्यात विजयाचा डाव टाकला! धनगरी पोशाख, माफी अन् येळकोट-येळकोटचा जयघोष

दक्षिण मुंबई लोकसभेच्या जागेसाठी महायुतीतील घटक पक्ष भाजप आणि शिंदे गटामध्ये चुरस सुरु होती. भाजपला दक्षिण लोकसभा मतदारसंघातून राहुल नार्वेकर यांना उमेदवारी देण्याबाबतचं सांगण्यात होतं. मात्र, शिंदे गट या जागेसाठी आग्रही असल्याने राहुल नार्वेकरांना धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवावी, अशी मागणी केली जात होती. मात्र, राहुल नार्वेकर कमळ चिन्हावर निवडणूक लढवण्यावरच ठाम असल्याचं सांगण्यात येत होते. अखेर शिंदे गटाने या जागेवर बाजी मारली असून यामिनी जाधव यांना उमेदवारी दिलीयं.

महाराष्ट्र भटकत्या आत्म्याचा शिकार, कुटुंबातही तसेच केले; नरेंद्र मोदींचा शरद पवारांवर निशाणा

दरम्यान, महायुतीप्रमाणेच महाविकास आघाडीतही जागावाटपावरुन अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या होत्या. अखेर मुंबईतील जागावाटपाात ठाकरे गटाला 4 जागा तर काँग्रेसला 2 जागा देण्यात आल्या आहेत. मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघातून अरविंद सावंत यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता महायुतीच्या उमेदवार यामिनी जाधव आणि महाविकास आघाडीचे अरविंद सावंत यांच्यात लढत होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

follow us

वेब स्टोरीज