नाराजी हेरली, ठाकरे बेसावध असतानाच दिल्लीला रवाना; संजय जाधव अन् संजय देशमुख शिंदेंच्या गळाला कसे लागले?

Split in Thackeray Shivsena शिवसेनेचा वर्धापन दिन अवघ्या एका दिवसांवर येऊन ठेपलेला असताना ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.

Split In Thackeray Shivsena

Split In Thackeray Shivsena

Split Is Confirmed In Thackeray Shivsena how Sanjay Jadhav and Sanjay Deshmukh in Shinde’s camp : शिवसेनेचा वर्धापन दिन अवघ्या एका दिवसांवर येऊन ठेपलेला असताना ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. कारण चार वर्षांनंतर आता पुन्हा एकदा ठाकरेंच्या पक्षाला फुटीचं ग्रहण लागलं आहे. यामध्ये ठाकरेंच्या 9 पैकी 6 खासदारांनी थेट शिंदेंच्या शिवसेनेची वाट धरली आहे. त्यानंतर आज दिल्ली येथे आयोजित संसदीय दलाच्या बैठकीत 6 खासदारांनी पाठ फिरवली आहे. यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ऑपरेशन टायगरला यश मिळाले असल्याची देखील आता जोराने राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. यामध्ये संजय देशमुख आणि संजय जाधव शिंदेंच्या गळाला कसे लागले? जाणून घेऊ सविस्तर…

ठाकरे गटातील बंडखोरांचा ‘कॅप्टन’ ठरला? परभणीचे ‘बंडू बॉस’ करणार फुटलेल्या खासदारांचे नेतृत्त्व

संजय देशमुख आणि संजय जाधव यांना गळाला लावण्यासाठी शिंदे गटातील एका वरिष्ठ मंत्र्याने आणि दिल्लीतील बड्या नेत्याने मोठी भूमिका बजावली. दरम्यान हे दोघे गेल्या काही दिवसांपासून ठाकरेंवर नाराज असल्याच्या चर्चा होत्या. याचाच फायदा शिंदेंनी घेतला. शिंदेंनी त्यांना विकासकामं आणि पुढील राजकीय भवितव्याचं अश्वासन दिलं. अशा चर्चा आहेत. दरम्यान ठाकरेंनी खासदार गायब होताच दिल्लीत बैठक ठेवली. त्यात जाऊ नये यासाठी या खाजगी विमानाने दिल्लीत गेले. पक्ष कार्यालयात नाहीतर हे खासदार शिंदेच्या नेत्याकडे गेले.

उज्ज्वल निकम यांनी ठाकरे गटाच्या बैठकीची हवाच काढली…म्हणाले व्हिप लागू होत नाही..

परभणीचे खासदार संजय जाधव, ज्यांना ‘बंडू जाधव’ म्हणूनही ओळखले जाते, हे मराठवाड्यातील शिवसेनेच्या अनुभवी नेतृत्वांपैकी एक मानले जातात. पक्षाच्या सुरुवातीच्या काळापासून ते संघटनेशी जोडलेले असून, परभणी जिल्ह्यात त्यांनी मजबूत राजकीय प्रभाव निर्माण केला आहे. त्यांनी दोन वेळा आमदार आणि तीन वेळा खासदार म्हणून जनतेचे प्रतिनिधित्व केले आहे.

युद्ध थांबताच कच्च्या तेलाच्या किंमती घटल्या मात्र भारतात इंधनाचे दर जैसे थे! केंद्रीय मंत्र्यांनी सांगितलं कारण

मात्र, गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या राजकीय हालचालींबाबत विविध चर्चा रंगू लागल्या आहेत. पक्षाच्या काही महत्त्वाच्या उपक्रमांमध्ये त्यांची अनुपस्थिती आणि वरिष्ठ नेतृत्वाशी कमी झालेला संपर्क यामुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. स्थानिक कार्यकर्त्यांशीही त्यांचा संवाद पूर्वीच्या तुलनेत कमी झाल्याचे बोलले जात असून, त्यांच्या पुढील राजकीय भूमिकेबाबत उत्सुकता वाढली आहे.या घडामोडींमुळे परभणीसह मराठवाड्यातील राजकीय समीकरणांवर लक्ष केंद्रित झाले असून, आगामी काळात जाधव कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संजय देशमुख यांची राजकीय वाटचाल आणि चर्चेतील हालचाली

यवतमाळ-वाशिमचे खासदार संजय देशमुख हे राज्याच्या राजकारणातील अनुभवी चेहरा मानले जातात. त्यांनी यापूर्वी राज्यमंत्री म्हणूनही काम पाहिले आहे. शिवसेनेतील 2022 मधील राजकीय घडामोडीनंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. यवतमाळ-वाशिम परिसरात पक्षाच्या प्रमुख नेतृत्वांपैकी एक म्हणून त्यांची ओळख आहे.अलीकडेच त्यांची शिंदे गटातील मंत्री प्रतापराव जाधव यांच्यासोबत दिल्लीत झालेली भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली. देशमुख यांनी ही भेट वैयक्तिक कारणांसाठी असल्याचे स्पष्ट केले असले, तरी तिच्या राजकीय परिणामांबाबत विविध तर्क-वितर्क व्यक्त केले जात आहेत.

नाराजीच्या चर्चांना का मिळत आहे बळ?

पक्षातील काही निर्णय आणि भविष्यातील राजकीय समीकरणांबाबत काही खासदारांमध्ये अस्वस्थता असल्याच्या चर्चा सुरू आहेत. आगामी निवडणुकांमध्ये मतदारसंघांचे वाटप, महायुतीची वाढती ताकद आणि स्थानिक राजकीय गणिते यामुळे काही नेत्यांच्या भूमिकेकडे विशेष लक्ष दिले जात आहे. तसेच पक्षांतर्गत निर्णयप्रक्रियेत अपेक्षित स्थान मिळत नसल्याची भावना काही नेत्यांमध्ये असल्याचेही बोलले जात आहे.लोकसभेतील महत्त्वाचे चेहरे मानले जाणारे हे नेते अलीकडील पक्षीय कार्यक्रमांपासून काहीसे दूर असल्याचे दिसून येत आहे. दिल्लीतील त्यांच्या हालचाली आणि काही बैठकींमधील अनुपस्थितीमुळे पक्षांतर्गत संवाद आणि समन्वयाबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Exit mobile version