Download App

पवारांनी मंत्री, पालकमंत्री वाटपही केले होते…; मुनगंटीवार यांचा मोठा दावा

Sudhir Mungantiwar On Sharad Pawar : राज्यातील 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होण्याआधी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाजपसोबत राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी बैठक घेतली होती. त्याचबरोबर मंत्रिपदं, जिल्ह्याचे पालकमंत्री आदी सर्व गोष्टी देखील या बैठकीत निश्चित केल्याचाही दावा भाजप नेते आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चांना उधाण आलं आहे. (Sudhir Mungantiwar Criticize On Sharad Pawar devendra fadnavis NCP BJP)

धक्कादायक! बकरी ईदच्या दिवशी सोलापुरात पाकिस्तानचा झेंडा, लव्ह पाकिस्तानचे फुगे विकण्याचा प्रयत्न

मंत्री मुनगंटीवार म्हणाले की, मागच्या काही महिन्यांपासून आपल्याकडे खोटं बोल पण रेटून बोल अशा प्रकारच्या गोष्टी सुरु आहेत. 2019 मध्ये शरद पवार यांनी मंत्रिपदं, पालकमंत्रिपदं देखील फायनल केली होती. अचानकपणे त्यांनी माघार घेतली आणि आपण कॉंग्रेसबरोबर जाणार असल्याचे सांगितले. शरद पवार यांच्या राजकीय कारकिर्दीबद्दल विचार केला तर देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या दाव्यावर विश्वास ठेवायला हरकत नाही, असंही यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.

फक्त 20 किलोमीटर अगोदर मणिपूर येथे राहुल गांधींचा ताफा अडवला

त्यावर आता वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, उद्धव ठाकरे आम्हाला सोडून जातील असं वाटलं नव्हतं. भाजप-शिवसेना आम्ही एकत्र लढलो होतो. पक्षाने मोठं मन केलं त्यांना जागा दिल्या. पण तेव्हाही बेइमानी झाली.
आम्ही आमच्या पक्षातून शिवसैनिक दिला.

उद्धव ठाकरे यांच्याबद्दल मला अनेकवेळा सहानुभूती राहिली आहे. जेव्हा ते मुख्यमंत्री होते,तेव्हा मी त्यांना अनेक वेळा सांगितले की, तुमची वाट चुकत आहे. पण त्यांनी ऐकलं नाही असंही यावेळी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच दिलेल्या एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत एक मोठा दावा केला आहे. पहाटेचा शपथविधी हा शरद पवार (Sharad Pawar)यांच्या संमतीनेच झाला असल्याचा दावा देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. त्यावरुन आधीच पहाटेचा शपथविधी पुन्हा चर्चेत आला आहे.

सरकार स्थापनेचा संपूर्ण आराखडा तयार करण्यात आला होता. अजित पवार आणि आपण या सरकारचे नेतृत्व करणार असल्याचे ठरले होते. सरकार स्थापनेची आम्ही सगळी तयारी केली होती. मात्र शरद पवार शेवटी क्षणी शरद पवार आपल्या शब्दापासून फिरले अन् त्यांनी माघार घेतली, असेही यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.

Tags

follow us