फक्त 20 किलोमीटर अगोदर मणिपूर येथे राहुल गांधींचा ताफा अडवला

फक्त 20 किलोमीटर अगोदर मणिपूर येथे राहुल गांधींचा ताफा अडवला

Rahul Gandhi at Manipur :  हिंसाचारग्रस्त मणिपूरला भेट देण्यासाठी आलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांना स्थानिक पोलिसांनी पुढे जाण्यापासून रोखले आहे. राहुल गांधी यांना इंफाळ विमानतळासमोरील विष्णुपूर चेकपोस्टवर थांबवण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षेच्या कारणास्तव राहुल गांधींचा ताफा थांबवण्यात आला आहे.

दरम्यान, काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी सांगितले की, राहुल गांधींच्या ताफ्याला पोलिसांनी 20 किलोमीटर अगोदर विष्णुपूरजवळ रोखले आहे. आम्हाला परवानगी देण्याच्या स्थितीत नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. राहुल गांधींना अभिवादन करण्यासाठी लोक रस्त्याच्या दुतर्फा उभे आहेत. आम्हाला समजत नाही की त्यांनी आम्हाला का रोखले?

पंढरपुरात विठू नामाचा गजर! मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली आषाढीची शासकीय महापूजा

त्याचवेळी पोलिसांकडून निवेदनही जारी करण्यात आले आहे. मीडिया रिपोर्टमध्ये विष्णुपूर एसपीच्या हवाल्याने म्हटले आहे की, परिसरातील परिस्थिती चिंताजनक आहे. अलीकडे काही ठिकाणी गोळीबार आणि जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. अशा परिस्थितीत आम्ही राहुल गांधींच्या सुरक्षेशी तडजोड करू शकत नाही आणि त्यांना पुढे जाऊ देण्याच्या स्थितीतही नाही.

काँग्रेस नेते राहुल गांधी आज २९ जून रोजी इंफाळला पोहोचले आहेत. एएनआयच्या वृत्तानुसार, राहुल गांधी दोन दिवस मणिपूर या हिंसाचारग्रस्त राज्याचा दौरा करतील आणि त्यांच्या दौऱ्यात मदत शिबिरांनाही भेट देतील. यासोबतच त्यांचा इम्फाळ आणि चुरचंदपूर येथील नागरी समाजाच्या प्रतिनिधींना भेटण्याचा कार्यक्रम आहे.

यानंतर काँग्रेसने ट्विट करत भाजपवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी हे मणिपूर येथील हिंसेत जखमी झालेल्या पीडितांना भेटण्यासाठी चालले होते. भाजपच्या सरकारने त्यांना रस्त्यातच अडविले. राहुल गांधी शांतीचा संदेश घेऊन मणिपूर येथे गेले आहे. सत्तेतील लोकांना शांती, प्रेम, बंधूभाव या गोष्टींचा तिटकारा आहे. पण त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे की हा देश गांधींच्या रस्त्यावर चालेल. हा देश शांतीच्या मार्गावर चालेल, असे म्हणत काँग्रेसने भाजपवर निशाणा साधला.

दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी मणिपूरमधील सध्याच्या परिस्थितीवरही भाष्य केले. ते म्हणाले की, मणिपूरच्या जनेतेचा सरकारशी संवाद तुटलेला असून, याचा अर्थ त्या ठिकाणी अराजकता माजलेली आहे. सरकारने पलायन केलेले. मणिपूर अस्थिर करण्यामागे चीनचा हात आहे हे स्पष्ट असून, अशा परिस्थितीत पंतप्रधानांनी जाऊन आपलं एक राज्य जे पेटलं आहे ते शांत करणं गरजेचं आहे. मात्र, तसे होत नसून, देशाचे संरक्षणमंत्री जम्मूला जातात आणि पाकिस्तानला दम देतात. त्याऐवजी मणिपूरला जा आणि चीनला डोळे वटारून दाखवा असा सल्ला राऊतांनी दिला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube