Sugriv Karad Entry In Santosh Deshmukh Murder : संतोष देशमुख हत्या (Santosh Deshmukh Murder) प्रकरणामध्ये सातत्याने नवनवीन ट्विस्ट आणि नवीन नावं समोर येत आहेत. आता या हत्याकांडामध्ये आणखी एका कराडची एन्ट्री झालीय. या कराडचं नाव सुग्रीव कराड (Santosh Deshmukh) आहे. जयराम चाटे आणि महेश केदारने दिलेल्या कबुलीमध्ये खळबळजनक खुलासा त्यांनी (Santosh Deshmukh) केला आहे. हत्याप्रकरणाची न्यायालयीन सुनावणी सुरू झालीय. दोन दिवसांपूर्वी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या उपस्थितीमध्ये बीड न्यायालयात सुनावणी झाली.
यावेळी हत्या प्रकरणाची बाजू मांडताना आरोपींच्या कृत्याचा कित्ताच गिरवलाय. खंडणीसाठी ही हत्या करण्यात आली, असं सीआयडीच्या तपासात निष्पन्न झालंय. तर आरोपींनी देखील याची कबुली दिली आहे. सध्या या प्रकरणातील (Chate And Mahesh Kedar Confession) आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार असून पोलीस त्याचा शोध घेतोय. या प्रकरणी आता सुग्रीव कराडची एन्ट्री झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. संतोष देशमुख अन् मस्साजोगच्या ग्रामस्थांनी सुग्रीव कराडच्या सांगण्यावूनच सुदर्शन घुलेला मारहाण केल्याचं सांगितलं. याच पूर्ववैमनस्यातूनच संतोष देशमुख यांची हत्या केली, अशी कबुली आरोपी चाटे आणि केदार यांनी दिलीय.
म्यानमार, थायलंडमध्ये 7.7 रिश्टर स्केलचा भूकंप; इमारती कोसळल्या, बँकॉकमध्ये आणीबाणी
तर या दोघांच्या जबाबामध्ये खंडणी प्रकरणाचा उल्लेख नसल्याचं समोर आलंय. तर एक वेगळाच खुलासा झालाय. अपमानाचा बदला घेण्यासाठी संतोष देशमुखला धडा शिकवायचा, असं कृष्णा आंधळेने आम्हाला सांगितलं होतं. त्यातून ही मारहाण आणि हत्या केली, असं या दोघांनी म्हटलंय. त्यांनी कबुली जबाबात सुग्रीव कराडचा उल्लेख केलाय. त्यामुळे या प्रकरणाला वेगळं नवीन मिळालंय.
सुदर्शन घुलेच्या अपमानाचा बदला घ्यायचा, म्हणून संतोष देशमुख यांना मारहाण केलीय. कारण घुलेला मारहाण केल्याने सुदर्शन घुले, वाल्मिक कराड यांची बदनामी झाली. याच बदनामीचा बदला आपल्याला घ्यायचा आहे. असं सांगत फरार आरोपी कृष्णा आंधळे यांनी विष्णू चाटे आणि केदार कराडला सोबत घेतलं.
सुग्रीव कराड हा केजमधील स्थानिक गुंड असल्याची माहिती मिळतेय. त्याने आमदार धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडसोबत काम केल्याचं देखील सांगितलं जातंय. केज नगरपंयायत निडणुकीच्यावेळी सुग्रीव कराड याने खासदार बजरंग सोनवण यांच्या मुलाचा पराभव केला होता. मात्र, सध्या सुग्रीव कराड खासदार बजरंग सोनवणे यांच्यासोबत असून तो राजकीय व्यक्ती असल्याचं सांगितलं जातंय. पंयायत समितीच्या निवडणुकीत कराडने आपल्या आईला निवडून आणलंय.