Download App

Sujay Vikhe : सत्ता बदलल्यानंतर काही नेते पक्ष बदलतात…पुढाऱ्यांवर विश्वास ठेऊ नका; विखेंचा खोचक टोला

Sujay Vikhe At Gharkul Bhumi Pujan Ceremony : अहिल्यानगर – सत्ता बदलली की काही नेते पक्ष बदलतात. परंतु गोरगरीब जनतेची सेवा केली तर जनता कधीच विसरत नाही. त्यामुळे जनतेवर विश्वास ठेवावा, पुढाऱ्यांवर नव्हे असा ठाम विश्वास माजी खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी व्यक्त केला. तसेच श्रीरामपूर बदलायच असेल तर ‘तुझं-माझं’ सोडून जनतेच्या हितासाठी काम करावं लागेल, असे विखे (Shriamapur) म्हणाले.

श्रीरामपूर तालुक्यातील दत्तनगर गावठाण फेज वन येथे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आणि जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विशेष पुढाकारातून घरकुलांच्या बांधकामाचा भूमिपूजन सोहळा (Gharkul Bhumi Pujan Ceremony) मा. खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी विधिवत पूजा करण्यात आली. सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. त्यांनी हा सत्कार स्वीकारून उपस्थित सर्वांशी संवाद साधला. या कार्यक्रमात बोलताना डॉ. सुजय विखे यांनी स्पष्ट शब्दांत राजकारणाची दिशा ठरवणारे विचार मांडले. राजकारण छोट्या गोष्टीवर न होता, गरिबांना घर, शेतकऱ्यांना वीज आणि शिक्षण मिळालं पाहिजे, असं त्यांनी म्हटलंय.

घरमालकांना मोठा दिलासा! आयटीएटीच्या नियमांनुसार पुनर्विकसित फ्लॅट्स ‘इतर उत्पन्न’ म्हणून करपात्र नाही

600 घरांची घोषणा

डॉ. विखेंनी जाहीर केले की, आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नातून श्रीरामपूरमध्ये (Ahilyanagar News) प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 600 नवीन घरकुलं मंजूर झाली आहेत. ही घरं सोलर सिस्टिमसह उभारण्यात येणार आहेत. यामध्ये दत्तनगर हे एकत्रित केंद्र असणार आहे.

गुन्हेगारी प्रवृत्तीला कडक इशारा

शहरातील वाढती गुन्हेगारी, चेन स्नॅचिंग, खंडणी आणि महिलांवरील अत्याचार यावर भाष्य करताना डॉ. विखे म्हणाले, कोणताही समाज असो, गुन्हेगारी प्रवृत्तीला समर्थन देणार नाही. अशांना उखडून फेकलं जाईल. श्रीरामपूरच्या कायदा अन् सुव्यवस्थेवर कठोर पावले उचलण्याचा इशाराही त्यांनी दिला.

फुले चित्रपटातील एकही सीन कट होता कामा नये; छगन भुजबळांचा आक्रमक पवित्रा

महामानवांची जयंती उपक्रमातून साजरी करा

यावेळी डॉ. सुजय विखे पाटील यांनी नागरिकांना आवाहन केले की, महामानवांच्या जयंतीत डीजे किंवा अनावश्यक खर्च न करता आरोग्य शिबिर, समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले पाहिजे. विचारांशी नातं जोडण्याचा खरा मार्ग तोच आहे. तसेच पुढ बोलताना ते म्हणाले, जनतेची कामं करा, जनता आपल्याला नेता बनवते. त्यासाठी कोणत्याही शिफारशीची गरज नसते, असा मार्मिक सल्ला देखील सुजय विखेंनी संभाव्य नगरसेवकांना दिला.

श्रीरामपूरसाठी मी सातत्याने येणार!

आपल्या भाषणात बोलताना सुजय विखे म्हणाले, ही फक्त सुरुवात आहे, श्रीरामपूरला आता मी वारंवार भेट देणार आहे. सर्वांनी एकत्र येऊन विकासात्मक दृष्टीने काम करूया, असं देखील मत मांडून विकासाला प्राधान्य देण्यासाठी सदैव कटिबद्ध असल्याचे आश्वासन दिले.

follow us