Download App

ही निवडणूक भावकीची नाही, अजित पवारांकडून नाव न घेता विरोधकांवर टीका

  • Written By: Last Updated:

Ajit Pawar : ही काही भावकीची निवडणूक नाही. त्यामुळे उगिच कुणी भावनिक होऊन ही निवडणूक भावकीची करत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करा असं म्हणत, अजित पवार यांनी अप्रत्यक्ष आपल्याच कुटुंबातील लोकांवर अप्रक्ष टीका केली आहे. (Ajit Pawar) ते आज आयोजित सभेत बोलत होते. यावेळी (Eknath Shinde)मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, (Devendra Fadnavis) उमेदवार सुनेत्रा पवार, राष्ट्रावादीचे नेते प्रफुल्ल पटेल उपस्थित होते.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी विरूद्ध काँग्रेस नेते राहुल गांधी

काही लोक आपल्याकडे येतील किंवा आपल्याला फोन करतील. काही भावनिक होऊन आपली बाजू मांडलीत. मात्र, यातील काही महत्चाचं नसून आपल्याला आपला देश कुणाच्या हातात द्यायचा आहे हे आता ठरवायच आहे. ही निवडणूक इथं कोण कुणाच्या विरोधात आहे अशी नसून, पंतप्रधान नरेंद्र मोदी विरूद्ध काँग्रेस नेते राहुल गांधी अशी आहे. त्यामुळे कोणत्याही आश्वासनाला आपण बळी पडू नका, असं म्हणत आपल्याला साथ द्या अशी विनंती अजित पवार यांनी यावेळी उपस्थितांनी केली.

 

आम्ही आता आमची वाट निवडली

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, काही लोक प्रचार करतात यांच्या काही नादी लागू नका. निवडणूक झाली की आम्ही एकत्र येणार आहोत. मात्र, असल्या अफवांना बळी पडू नका. आम्ही आता आमची वाट निवडली आहे. आम्ही आमच्या मार्गाने जाणार आहोत. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या विचांनी आम्ही पुढे जात आहोत असंही अजित पवार यावेळी म्हणाले. तसंच, आम्ही एकत्र ऐणार नाहीत हेही त्यांनी यावेळी अप्रत्यक्ष स्पष्ट केलं.

 

विरोधी भूमिका घेतली तर तीही कट्टर

मित्र असावा तर असा आणि विरोधक असावा तर असा अशा शब्दांत अजित पवार यांनी यावेळी उपस्थित असलेले विजय शिवतारे यांची स्तुती केली. त्यांनी जर एखाद्याशी मैत्री केली तर ती मैत्रिही ते कट्टर असते आणि त्यांनी जर एखाद्याशी विरोधी भूमिका घेतली तर तीही कट्टर असते असंही अजित पवार यावेळी म्हणाले. शिवतारेआणि अजित पवार यांच्यामध्ये काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समजोता घडवून आणला आहे.

follow us