Download App

लाजिरवाणी परिस्थिती निर्माण करू नका : सुप्रीम कोर्टात ‘घड्याळा’ वरून खडाजंगी, दादांना कडक सूचना

Supreme Court Warning Ajit Pawar On Clock Symbol : सुप्रिम कोर्टात आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हाच्या मुद्द्यावर सुनावणी पार पडली. यावेळी अजित पवारांना (Ajit Pawar) सुप्रीम कोर्टाने दिलासा दिलाय. लाजिरवाणी परिस्थिती निर्माण करू नका, असं सुप्रिम कोर्टाने म्हटलंय. अजित पवार आणि शरद पवार यांच्यावर ‘घड्याळा’ वरून खडाजंगी सुरू असताना सर्वोच्च न्यायालयाने सुनावणं आहे. आता विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या पक्षाला घड्याळ हे चिन्ह वापरता येणार आहे. परंतु, त्यासाठी सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निर्देशांचं पालन करणं बंधनकारक (Clock Symbol) आहे. अन्यथा कारवाई करू, असा कडक इशारा हायकोर्टाने अजित पवार यांना दिलाय.

दरम्यान कोर्टाने (Supreme Court) शरद पवार आणि अजित पवार या दोघांनाही निर्देशांचं पालन करा. अन्यथा न्यायालयाच्या अवमानाचा ठपका ठेऊ, असा इशारा दिलाय. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 6 नोव्हेंबर रोजी होईल, असं जाहीर केलंय. त्यामुळे आता पुढील सुनावणीत काय होतं? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. आता अजित पवारांना घड्याळ चिन्ह वापरतान ‘हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे’ असं लिहावं लागणार आहे. तसंच अजित पवारांना शरद पवारांनी (Sharad Pawar) दाखल केलेल्या अर्जावर आणि कोर्टाच्या निर्देशावर प्रतिज्ञापत्र देखील द्यावं लागणार आहे.

पंतप्रधान मोदींच्या सभांनी महाराष्ट्रात वारं फिरणार? 8 दिवस तळ ठोकणार, भाजपची जय्यत तयारी

आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत अजित पवार गटाला ‘घड्याळ’ चिन्ह वापरण्यापासून रोखण्यासाठी शरद पवार गटाने न्यायालयातत याचिका दाखल केली होती. या अर्जावर न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि उज्वल भुयान यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. या अर्जाद्वारे शरद पवार यांनी न्यायालयाने अजित पवारांना विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी नवीन चिन्हासाठी अर्ज करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी केलीय.

सुनावणीदरम्यान शरद पवार गटाचे ज्येष्ठ वकील डॉ. ए.एम. सिंघवी यांनी, “कोणीही न्यायप्रविष्ठ असलेल्या चिन्हाचा वापर करू नये”. कोर्टाने घातलेल्या अटींचे पालन केले नसल्याने त्यांना घड्याळ चिन्ह वापरण्यास मनाई (assembly elections) करावी, असा युक्तिवाद केला होता. अजित पवार यांच्या बाजूने ज्येष्ठ वकील बलवीर सिंग यांनी सिंघवी यांच्या युक्तिवादांचं खंडन केलं. त्यांनी दावा केलाय की, सर्व पत्रक आणि प्रचार सामग्रीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्याप्रमाणे अस्वीकरण होते.

सरकार घालवण्यासाठी जनता सुसज्ज ; इस्लामपूरमधून शक्तिप्रदर्शन करत जयंत पाटलांनी भरला उमेदवारी अर्ज

उल्लेखनीय म्हणजे सिंघवी यांनी पोस्टर्सचे काही स्क्रीनशॉट तयार केले होते. ते त्यांनी अधिकृत ‘X’ हँडल NCP आणि अजित पवार यांच्या फेसबुक पेजवरून पोस्ट केले होते. ते म्हणाले की, अजित पवार सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत नाहीत. त्यांनी एनसीपी पक्ष कार्यालयाच्या (मुंबईतील) फोटोंचा संदर्भ दिला होता. ज्यात त्यांचे सहकारी अधिवक्ता प्रांजल अग्रवाल यांनी बॅनर प्रदर्शित केले होते.

 

follow us