Download App

फडणवीसांनी उल्लेख केलेला राजकीय दबाव नेमका कुणाचा? पुणे अपघातप्रकरणी सुप्रिया सुळेंचा सवाल

Supriya Sule यांनी पत्रकार परिषद घेत देवेंद्र फडणवीसांना या प्रकरणामध्ये ते म्हटल्याप्रमाणे कुणाचा राजकीय दबाव होता? असा सवाल केला आहे.

Supriya Sule Criticize Devendra Fadanvis On Pune Accident : शहरातील कल्याणीनगर ( Pune Accident ) भागात चार दिवसांपूर्वी मध्यरात्री भरधाव वेगातील पोर्शे (Porsche Car) कारनं दोन आयटी तरूणांचा जीव घेतला. त्यानंतर आता राजकीय वर्तुळात देखील या प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. त्यात आता सुप्रिया सुळे ( Supriya Sule) यांनी पत्रकार परिषद घेत देवेंद्र फडणवीसांना ( Devendra Fadanvis) या प्रकरणामध्ये ते म्हटल्याप्रमाणे कुणाचा राजकीय दबाव होता? असा सवाल केला आहे.

शिर्डी लोकसभा : सामना लोखंडे विरुद्ध वाकचौरेंचा…मात्र कसोटी विखे-थोरातांची

सुळे म्हणाल्या की, पुणे अपघाताच्या घटनेमध्ये कुणाच्या राजकीय दबावामुळे संबंधित मुलाला जामीन मिळाला. राजकीय दबावाला बळी पडू नका असं म्हणणारे देवेंद्र फडणवीस नेमका कुणाबद्दल बोलत होते? हे त्यांनी राज्याला सांगावं त्याचबरोबर राजकीय दबाव हा सत्ताधारी पक्ष टाकू शकतो. तसेच दोन लोकांचे जीव घेतल्यानंतर संबंधित मुलाला केवळ निबंध लिहिणे. अशा प्रकारच्या किरकोळ शिक्षा दिल्या जातात. हे सरकार असंवेदनशील असल्याचे यावरून दिसत. असेही यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या.

फडणवीसांचा राजीनामा मागणाऱ्या सुप्रियाताई गप्प का? त्यांचा अग्रवाल कुटुंबाशी संबंध…; नितेश राणेंचं विधान

तसेच यावेळी सुप्रिया सुळे यांना पुणे अपघाता प्रकरणी अजित पवार यांच्या बाबत प्रश्न विचारला असता, त्या म्हणाल्या की, पुण्याच्या पालकमंत्र्यांसोबत माझी देखील गेले कित्येक दिवसांपासून भेट नाही. कारण जिल्ह्यामध्ये पुणे अपघातासह दुष्काळ इंदापूरमधील घटना अतिवृष्टी असे अनेक प्रश्न आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस काल पुण्यात आले असता हा पुण्याच्या पालकमंत्र्यांबाबतचा प्रश्न त्यांना विचारायला हवा होता. असं म्हणत यावेळी सुप्रिया सुळे यांनी गेल्या काही दिवसांपासून पुण्यामध्ये गैरहजर असणाऱ्या अजित पवार यांना टोला लगावला आहे.

दरम्यान पुण्यात हा अपघात घडल्यानंतर बिल्डरचा अल्पवयीन मुलगा असल्याने पोलिसांवर राजकीय दबाव असल्याचा आरोप करण्यात येत होता. त्यावर बोलताना आमदार सुनिल टिंगरे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. सुनिल टिंगरे म्हणाले, ही घटना माझ्या मतदारसंघात घडल्याबद्दल दुख: व्यक्त करीत असून मला रात्री 3 वाजून 21 मिनिटांनी माझ्या स्वीय सहाय्यकाचा अपघात झाला असल्याचा फोन आला. त्यानंतर अग्रवाल यांचा देखील फोन आला की माझ्या मुलाला मारहाण झाली. त्यानंतर मी पोलिस ठाण्यात पोहोचून कायद्यानूसार कारवाई करण्यास सांगितलं असल्याचं आमदार टिंगरे यांनी सांगितलं आहे.

follow us