ताई…आम्ही खोलात गेलो तर अवघड जाईल; भाजपचा Supriya Sule यांच्यावर पलटवार

  • Written By: Published:
ताई…आम्ही खोलात गेलो तर अवघड जाईल; भाजपचा Supriya Sule यांच्यावर पलटवार

मुंबई : जळगाव जिल्ह्यात तहसीलदार, मंडळाधिकारी व इतर कर्मचाऱ्यांची कंत्राटी भरती केली जाणार आहे. त्यावरून सरकारला विरोधकांनी घेरले आहे. केवळ भूसंपादन वेगात होण्यासाठी ही भरती करण्यात आल्याचे स्पष्टीकरण सरकारकडून करण्यात आला आहे. या भरतीवरून खासदार सुप्रिया (Supriya Sule) सुळे आणि भाजपमध्ये (BJP) जोरदार जुंपली आहे. भाजपाला या महाराष्ट्राचे नेमके काय करायचेय? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केलाय. त्याला भाजपने ‘एक्स’वरून जोरदार प्रत्युत्तर दिले. ताई, विद्यार्थ्यांना हाताशी धरून राजकारण करू नका, असे भाजपने म्हटले आहे.

आता तहसीलदार देखील कंत्राटी नेमण्याचा घाट या सरकारने घातला आहे. खरेतर या सरकारने मुख्यमंत्री, हवे तेवढे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री आणि अखे मंत्रिमंडळ कंत्राटी पद्धतीने चालवायला द्यावे. उपहासाचा भाग सोडला तर हे सरकार असे असंवेदनशील निर्णय का घेतेय याचे आश्चर्य वाटते, असे सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी ट्वीटरवर म्हटले आहे.

या राज्यात लाखो मुले दरवर्षी तहसीलदार, तत्सम पदांवर निवड व्हावी यासाठी एमपीएससीची परीक्षा देतात. यासाठी वर्षोनुवर्षे झिजून अभ्यास करतात. मेहनत करतात. त्यांची अर्धी संधी अगोदर लॅटरल एन्ट्रीच्या नावाखाली आणि उरलेली अर्धी कंत्राटी पद्धतीच्या नावाखाली गिळंकृत केली आहे. संपूर्ण व्यवस्थेचा खेळखंडोबा करणारे हे असले आदेश काढण्याआधी किमान या मुलांचा तरी विचार शासनाने करायला हवा होता. काही चांगले करता येत नसेल तर किमान कुणाचे वाईट तरी करु नये हे तत्त्व या राज्यकर्त्यांच्या लक्षात येत नाही, असे सुळे यांनी म्हटले आहे.


Ajit Pawar यांच्या सोबत गेलेल सर्व आमदार स्वगृही परतण्याच्या विचारात; जयंत पाटलांचा मोठा दावा

ताई, विद्यार्थ्याना हाताशी धरून राजकारण करू नका..आम्ही खोलात गेलो तर अवघड जाईल.. परत राजकीय द्वेष म्हणून रडू नका, कंत्राटी भरतीची संबंधित जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर काही तुमच्यासारख्या राजकीय लोकप्रतिनिधिनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देणे चालू केल आहे. जेव्हा तुम्ही सत्तेत होते तेव्हा बॅकलिस्ट असणाऱ्या कंपन्यांना नोकरभरतीचे कॉन्ट्रॅक्ट देऊन परीक्षा घेतल्यात. सुप्रियाताई याबद्दल तुम्हाला चांगलीच माहिती आहे, असे भाजपने म्हटले आहे.

पहाटे पावणे चार वाजता झोपायला गेलो, इतक्यात…; शरद पवारांनी सांगितल्या किल्लारी भूकंपाच्या आठवणी

प्रितेश देशमुख, न्यासा कम्युनिकेशन याबद्दल आम्ही तोंड उघडले तर ताई तुम्हाला पक्षाला अवघड होईल. कारण, तुमच्या काळात प्रितेश देशमुखने न्यासाच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेत भ्रष्टाचार तर झाला होता म्हणून तुमच्या तत्कालिन सरकारला भरतीही रद्द करावी लागलेली होती, असा सवाल भाजपने उपस्थित केलाय. ताई आपण विद्यार्थ्यांची दिशाभूल करण्यापेक्षा फॅक्ट समजावून घेऊन ट्विट करायला पाहिजे होते, तुम्ही जबाबदार लोकप्रतिनिधी आहात. आपल्या सारख्या अभ्यासू संसदरत्न लोकप्रतिनिधी जर अस विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत राजकारण करत असतील तर त्यासारखी लाजिरवाणी गोष्ट कोणतीही नाही. तुम्हाला जर राजकारण करायचे असेल तर आमचे खुले आवाहन आहे. विद्यार्थी हितासाठी तुम्हाला जशास तसे 24×7 उत्तर द्यायला आम्ही समर्थ आहोत. सुप्रियाताई नेमकी कंत्राटी भरती आपण समजूनच घेतली नाही, म्हणून थोडीशी माहिती तुमच्यासाठी देत आहोत तुमच्या माहितीत तेवढीच भर पडेल.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube