Ajit Pawar यांच्या सोबत गेलेल सर्व आमदार स्वगृही परतण्याच्या विचारात; जयंत पाटलांचा मोठा दावा

  • Written By: Published:
Ajit Pawar यांच्या सोबत गेलेल सर्व आमदार स्वगृही परतण्याच्या विचारात; जयंत पाटलांचा मोठा दावा

Jayant Patil On Ajit Pawar : दोन महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीत (NCP) बंड झालं. अजित पवारांसह (Ajit Pawar) त्यांचे समर्थक आमदार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सत्तेत सहभागी झाले. त्यामुळं सध्या राष्ट्रवादीत दोन गट दिसतात. शरद पवारही भाजपला पाठिंबा देतील, असे दावे केले जात आहेत. अशातच आता शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी मोठं विधान केलं आहे. अजित पवार यांच्यासोबत गेलेले सर्व आमदार स्वगृही परतण्याच्या विचारात आहे, असा दावा पाटील यांनी केला आहे.

काही दिवसांपूर्वीच अजित पवारांनी अर्थखातं आपल्याकडे किती दिवस राहिल, हे ठाऊक नाही, असं विधान करून आपली नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळं हे सरकार कधीही कोसळू शकतं, असं आडाखे बांधले जात आहे. दरम्यान, आज पुण्यात पत्रकारांशी बोलतांना जयंत पाटील म्हणाले की, कोणत्याही पक्षाचे आमदार दुसरीकडे गेले तर त्यांच्यासोबत पक्षही गेला ही भावनाच मुळात चुकीची आहे. दुसरीकडे गेलेले अनेक आमदार जे झाले ते चुकीचं झाल्याचं सांगत आमच्याकडे परत येण्याच्या विचारात आहे, असं दावा पाटील यांनी केला.

पहाटे पावणे चार वाजता झोपायला गेलो, इतक्यात…; शरद पवारांनी सांगितल्या किल्लारी भूकंपाच्या आठवणी 

अजित पवार गट राष्ट्रवादीच्या पक्षावरच आणि घड्याळ चिन्हावर दावा ठोकत आहे. यावर बोलतांना ते म्हणाले की, सध्या राज्यात राजकीय पक्ष पळवणारी आणि राजकीय पक्ष चोरण्याची पध्दत रुढ होत आहे. काही जण पक्ष स्थापन करणाऱ्या संस्थापक अध्यक्षांनाच पदावरून दूर करून आपलाच पक्ष खरा असल्याचा अविर्भाव आणत आहेत, अशी टीकाही त्यांनी अजित पवार यांचे न घेता केली.

पाटील म्हणाले, आम्ही आमची बाजू निवडणूक आयोगासमोर मांडली आहे. शरद पवार यांनी निवडणूक आयोगाला आपली बाजू ऐकून घेण्याची विनंती केली. मात्र त्यानंतरही निवडणूक आयोगाने 6 ऑक्टोबर रोजी सुनावणी निश्चित केली. तर दुसरा गटही शरद पवार हेच पक्षाचे अध्यक्ष असल्याचे सांगत आहे. पण, नंतर भूमिका मांडत आहेत. निवडणूक आयोगाला सर्व माहिती आहे. निवडणूक आयोग लवकरच योग्य निर्णय घेईल, असा आम्हाला विश्वास आहे.

जळगावातील नायब तहसीलदार हे पद कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत पाटील म्हणाले की, महाराष्ट्रात प्रचंड बेरोजगारी असून लाखो मुले स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत. सरकारी नोकरी मिळवण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते. कंत्राटी पद्धतीने अधिकारी व कर्मचाऱ्यांची भरती करून मुलांच्या भवितव्याशी खेळ केला जात आहे. महत्त्वाच्या पदांवर कंत्राटी अधिकाऱ्यांची भरती करायची असेल, तर सरकार कंत्राटी पद्धतीने चालवले पाहिजे, अशी टीकाही त्यांनी केली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube