Supriya Sule : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) सध्या शिर्डीत दोन दिवशीय अधिवेशन सुरू आहे. यावेळी बोलतांना खासदार सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule)राज्यातील सद्यस्थितीवरून भाजप आणि अजित पवार (Ajit Pawar) गटावर जोरदार टीका केली. दिल्लीश्वरांनी डोळे वटारले की ते घाबरतात, असा टोला सुळेंनी लगावला.
दिग्पाल लांजेकराच्या ‘शिवरायांचा छावा’ आगामी चित्रपटाचा अंगावर शहारे आणणारा टीझर रिलीज
या शिबिराला संबोधित करतांना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मी अजित पवार गटाच्या विरोधात बोलावं, असं अनेकाना वाटतं. पण, मी त्यांच्या विरोधात बोलणार नाही. जो गरीब आहे, लाचार आहे, त्याच्यासी आपल्याला लढायचं नाही. तर आपल्यापेक्षा वरचढ असलेल्या लोकांशी आपली लढाई आहे. दिल्लीत बसलेल्यांशी आपल्याला संघर्ष करायचा आहे. आपली लढाई यांच्याशी नाहीच आहे. कारण, दिल्लीने डोळे वटारले के ते घाबरतात, अशी टीका सुळेंनी केली.
Kolhapur : राजकीय हालचालींना वेग; भाजपची ताकद वाढणार? सतेज पाटलांबद्दल मोठा गौप्यस्फोट
माझ्यावर आईस (ईडी, सीबीआय) नसल्यामुळं मला अजित दादांसारखी दिल्लेश्वरांची भीती वाटत नाही. मेरी इनानदारी मेरी ताकद आहे, असं सुळेंनी ठणकावलं.
काही दिवसांपूर्वी अजित पवारांनी शरद पवारांचं नाव घेता त्यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यांनी 38 व्या वर्षी बंड करून वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसला आणि त्यांना बाजूला सारलं, असं वक्तव्य अजितदादांनी केलं होतं. त्यावरही सुळेंनी भाष्य केलं. स्वत:च्या कर्तृत्वावर आमच्या आजी तेव्हा पुणे बोर्डावर निवडणून आल्या होत्या. तेव्हा त्यांच्यामागे कुठला राजकीय वारसा नव्हता. तसंच 38 व्या वर्षी स्वत:च्या हिमतीवर शरद पवार मुख्यमंत्री झाले होते. त्यावेळी त्यांच्यामागे माझ्या आणि अजितदादांसारखी घराणेशाही नव्हती, असा टोला त्यांनी लगावला.
शरद पवारांनी अजित पवार गटाला माझा फोटो वापरू नका, अशी सक्त ताकीद दिल्यानंतर अजित पवार गटाने यशवंतराव चव्हाणांचा फोटो वापरून त्यांच्या आदर्शावर चालणार असं स्पष्ट केलं होतं. यावरूनही सुळेंनी अजित पवार गटाची कोंडी केली. यशवंताराव चव्हाण यांची भूमिका भाजपला आणि आरएसएसला पुरक नव्हती. त्यांचं आणि आरएसएसकधी जमलं नाही. मात्र, आज यशवंतराव चव्हाणाचा आदर्श सांगणारे भाजपच्या वळचणीला गेले, अशी टीका त्यांनी केली.