दिग्पाल लांजेकराच्या ‘शिवरायांचा छावा’ आगामी चित्रपटाचा अंगावर शहारे आणणारा टीझर रिलीज

दिग्पाल लांजेकराच्या ‘शिवरायांचा छावा’ आगामी चित्रपटाचा अंगावर शहारे आणणारा टीझर रिलीज

Shivrayancha Chhava Teaser Released: छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा भव्य इतिहास रुपेरी पडद्यावर दाखवणाऱ्या दिग्दर्शक-निर्माता दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) यांनी आता स्वराज्याचे धाकले धनी अर्थात छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांचा इतिहास रुपेरी पडद्यावर दाखवणार आहे. (Shivrayancha Chhava Teaser) दिग्पाल लांजेकर यांच्या ‘शिवरायांचा छावा’ या आगामी मराठी सिनेमाचा धमाकेदार टीझर नुकताच चाहत्यांच्या भेटीला आला आहे. या टीझरमधून या सिनेमात छत्रपती संभाजी महाराज साकारणाऱ्या अभिनेत्याची झलक देखील चाहत्यांना बघायला मिळाली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by MarathiStars (@marathistar)


‘कोण शत्रू यावरी करील कैसा कावा, वाघालाही फाडतो हा “शिवरायांचा छावा”. छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत अभिनेता भूषण पाटील’, असे कॅप्शन देऊन ‘शिवरायांचा छावा’ या सिनेमाचा धमाकेदार टीझर शेअर करण्यात आला आहे. या दमदार टीझरमध्ये छत्रपती संभाजी महाराज वाघाशी लढत असल्याचे दिसत आहेत. वाघाच्या जबड्यात हात घालून त्याचे दात मोजणारे छत्रपती संभाजी महाराज या टीझरमध्ये बघायला मिळाले आहेत. मराठमोळा अभिनेता भूषण पाटील याने या सिनेमात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारण्याचं शिवधनुष्य हाती घेतलं आहे. या टीझरवर आता चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा मोठ्या प्रमाणात पाऊस पाडत आहेत.

चाहते देखील हा चित्रपट पाहण्यासाठी मोठ्या उत्सुकतेने वाट बघत आहेत. गेल्याकाही दिवसांपूर्वी या मराठी सिनेमाचं जबरदस्त पोस्टर चाहत्यांच्या भेटीला आलं होतं. तेजस्वी, धाडसी, शस्त्रशास्त्र पारंगत शंभूराजांची भूमिका मोठ्या पडद्यावर बघायला मिळणार आहे. ‘शिवरायांचा छावा’ सिनेमाच्या लक्षवेधी टीझरने चाहत्यांची मोठी उत्सुकता लागली आहे. इतिहासाच्या पानांवर सुवर्णाक्षरांत कोरलं गेलेलं स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचे अवघे आयुष्य एक धगधगते अग्निकुंडच आहे.

Amala Paul: लग्नाच्या दोन महिन्यांतच अभिनेत्रीने दिली ‘गुडन्यूज’; फोटो शेअर करत म्हणाली…

संभाजी महाराजांचा जीवनपट रुपेरी पडद्यावर उलगडण्याचे शिवधनुष्य दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी हाती घेतले आहे. ‘शिवरायांचा छावा’ नववर्षात म्हणजेच 16 फेब्रुवारी 2024 ला चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. संभाजी महाराजांच्या धगधगत्या अजेय पराक्रमाची कथा दिग्पाल लांजेकरांनी लिहिली आहे तर पटकथा-संवाद आणि गाणी देखील त्यांचीच आहेत. या गाण्यांना साजेसे संगीत युवा संगीतकार देवदत्त मनीषा बाजी यांनी दिले आहे. तर, पार्श्वसंगीत अमर मोहिले यांनी दिले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज