Download App

‘हनीमून संपायच्या आतच नाराजी’; सुप्रिया सुळेंचा अजितदादांना अप्रत्यक्ष टोला

Supriya Sule On Ajit Pawar : गेल्या काही दिवसांपासून अजित पवार नाराज असल्याचं बोललं जात आहे. अजित पवार(Ajit pawar) यांच्या कृतीतून ते नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं असतानाच आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्या नाराजीवरुन अप्रत्यक्ष टोलेबाजी केली आहे. हनीमून संपायच्या आतच नाराजी सुरु झाली असल्याचा अप्रत्यक्ष टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला आहे. एका कार्यक्रमादरम्यान, सुप्रिया सुळे(Supriya Sule) बोलत होत्या.

उद्योजक पुनीत बालन यांच्यावर महापालिकेची कारवाई; जाहिरातीप्रकरणी तब्बल तीन कोटींचा दंड

सुप्रिया सुळे म्हणाल्या, मागील तीन महिन्यांपूर्वीच राज्यात ट्रिपल इंजिनचे सरकार स्थापन झाले. त्यानंतर आता या तीन महिन्यात सरकारमध्ये नाराजी सुरू झाली आहे. ट्रिपल इंजिनमधील एक नाराज घटक देवेंद्र फडणवीसांना भेटले आहे. हनीमून संपायच्या आतच नाराजी सुरु झाली. तीन महिन्यातच या गोष्टी सुरु झाल्या आहेत, म्हणजे नेमकं सरकार चालवतंय कोण? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे.

जातीय जनगणनेवरुन केंद्र अन् राज्य भाजपमध्ये विरुद्ध प्रवाह? बावनकुळे आग्रही; मोदींची टीका

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आधी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्याकडे पाठ फिरवली. त्यानंतर सर्व मंत्रिमंडळ, सिनेसृष्टीतील दिग्गजांनी वर्षा बंगल्यावर जात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. मात्र इथेही जाणे अजितदादांनी टाळले. या दोन अनुपस्थितीची चर्चा होत असतानाच अजितदादांनी आज कॅबिनेट बैठकीला दांडी मारली. विशेष म्हणजे मंत्रालयात असूनही त्यांनी बैठकीला जाण्याचे टाळल्याने राजकीय वर्तुळात अजित पवार नाराज असल्याच्या चर्चांनी ऊत आला आहे.

नांदेड दुर्घटना! नर्सेसच्या बदल्या, डॉक्टरांची कमतरता; चव्हाणांनी सांगितली सत्य परिस्थिती

अजितदादांच्या नाराजीमागे निधी आणि पालकमंत्रीपदाचे फेरवाटप हे दोन्ही जुने वाद कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे. मागील काही दिवसांपासून शिवसेनेच्या आमदार आणि मंत्र्यांनी पुन्हा जुना सूर आळवायला सुरुवात केल्याचे पाहायला मिळत आहे. अजितदादा निधी देत नाहीत, आमची फाईल पुढे सरकवत नाहीत, अशा तक्रारी शिवसेना आमदार आणि मंत्र्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केल्या असल्याचं बोललं जात आहे.

‘सर्वोच्च न्यायालय सोडलं तर सगळं…; संजय राऊतांची भाजपवर घणाघाती टीका

दुसऱ्या बाजूला पालकमंत्रीपदावरुन राष्ट्रवादीत खदखद वाढली आहे. शिंदे सरकारमध्ये अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या नऊ मंत्र्यांचा समावेश होऊन आता तीन महिने पूर्ण झाले आहेत. या काळात या मंत्र्यांना खातेवाटप झाले, मात्र अद्यापही त्यांच्याकडे कोणत्याही जिल्ह्याचे पालकमंत्रीपद दिलेले नाही. निवडणुकांच्या तोंडावर लवकरात लवकर पालकमंत्रीपदाचे फेरवाटप करा अशी मागणी अजितदादांच्या गटाकडून करण्यात येत आहे. मात्र शिंदेंकडून या मागणीला प्रतिसाद मिळालेला नाही.

दरम्यान, मागील काही दिवसांपासून अजित पवार यांनी त्यांच्या कृतींमधून त्यांची नाराजी दाखवून दिल्याचे दिसून येत आहे. आधी शहांच्या दौऱ्याकडे पाठ, वर्षा बंगल्यावर न जाणे आणि आता मंत्रालयात असूनही त्यांनी कॅबिनेट बैठकीला दांडी मारणे, या सर्वांमुळे अनेक सवाल उपस्थित होत आहेत. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अचानकपणे दिल्ली दौऱ्यावर गेले असताना दुसरीकडे आणखी एक उपमुख्यमंत्री अजित पवार हे नाराज असल्याची चर्चा सुरू आहे.

Tags

follow us