‘सर्वोच्च न्यायालय सोडलं तर सगळं…; संजय राऊतांची भाजपवर घणाघाती टीका

‘सर्वोच्च न्यायालय सोडलं तर सगळं…; संजय राऊतांची भाजपवर घणाघाती टीका

Sanjay Raut : शिवसेनेनंतर (Shiv Sena) राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये (NCP) फुट पडली. अजित पवार गट सत्तेत सहभागी झाला. त्यानंतर त्यांनी पक्षावरच दावा ठोकला आहे. यासंदर्भात निवडणूक आयोगासमोर सुनावणी होणार आहे. मात्र, त्यापूर्वीच अजित पवार गटाकडून पक्षाचे नाव आणि चिन्ह मिळेल, असा दावा केला जात आहे. प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी अशी भूमिका मांडल्यानंतर निवडणूक आयोग याबाबत निःपक्षपातीपणे निर्णय देणार नाही, अशी भीती खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी व्यक्त केली. यानंतर आता खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाष्य केलं.

Solapur Crime: डीजे ऑपरेटरला कर्नाटकात तुंबळ मारहाणीत मृत्यू; काय आहे नेमकं प्रकरण? 

खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदे घेतली. यावेळी त्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेचच्या संदर्भाने प्रश्न विचारला होता. प्रफुल्ल पटेल यांनी पक्ष चिन्ह आपल्यालाच मिळेल, असं ठामपणे सांगितलं. यावर बोलतांना राऊत म्हणाले की, प्रफुल्ल पटेल यांना भारतीय निवडणूक आयोगाने अध्यक्ष बनवलं असेल.आमच्या वेळेला देखील शिंदे गटातले काही नेते तारखा देत होते. आज प्रफुल्ल पटेल हे काम करत आहेत. हे स्वतंत्र संस्था राहिली नाही. ही भारतीय जनता पार्टीची कटपुतली बनली आहे, अशी टीका राऊतांनी केली.

राऊत म्हणाले, निवडणूक आयोगाच्या माध्यमातून भाजप व दिल्लीतील राज्यकर्ते खेळ करत आहेत. सर्व घटनात्मक पदावरील व्यक्तींचा ताबा घ्यायचा आणि आपल्यलाला हवे ते निर्णय घ्यायचे, हे भाजपचं धोरणं आहे. एक सर्वोच्च न्यायालय सोडलं तर बाकी सगळं काही त्यांच्या हातात आले आहे, असं राऊत म्हणाले.

तेव्हा शिंदे कार्यकारिणीतही नव्हते
ते म्हणाले की, शिवसेना जेव्हा फुटली, तेव्हा 40 आमदार सोडून गेले या एका भूमिकेवर निवडणूक आयोगाने शिवसेना शिंदेंच्या ताब्यात दिली. हा सरळ सरळ अन्याय आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली. तब्बल 55 वर्षांनंतर त्यांची सूत्रे अधिकृतपणे उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवण्यात आल होती. त्यावेळी आजचे एकनाथ शिंदे शिवसेनेच्या कार्यकारिणीतही नव्हते. तेव्हा ते ठाण्याचे नगरसेवक होते. मग त्यांची शिवसेना कशी झाली? बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाच्या वेळी एकनाथ शिंदे आमदार असतील. नेते नव्हते. आणि आज अचानक शिवसेना शिंदेंची कशी सांगता? हे कोणते दुकान आहे? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

खलिस्तानी समर्थक हरदीप निज्जरच्या हत्येमुळे भारत आणि कॅनडामधील तणाव वाढला आहे. परदेशात भारतीय राजदूतांना मिळणाऱ्या धमक्या दिल्या जात आहे. या सगळ्यांवरून राऊतांनी पीएम नरेंद्र मोदींवर टीका केली. या निवडणुकीत भारत पाकिस्तान नाही, भारत खलिस्तान होणार आहे. मोदी हे महान विश्वगुरू असले महासत्ताधीश असले तरी आज गुरुद्वारामध्ये जाण्यापासून रोखलं जात आहे, असा टोला राऊतांना लगावला.

काही दिवसांपूर्वी मुलुंड पश्चिम येथे एका मराठी महिलेला ऑफिससाठी जागा नाकारण्यात आली. यावरून राऊतांनी सीएम शिंदेवर टीका केली. मराठी माणसाच्या या अवस्थेला एकनाथ शिंदे जबाबदार आहेत. त्यांना ही परिस्थिती आणायची होती. म्हणूनच तर शिवसेना फोडली. जेणेकरून मुंबईत मराठी माणसाचा आवाज संपवता येईल. शिंदे आणि त्यांचे लोक महाराष्ट्रासाठी बेईमान आहे, अशी टीका राऊतांनी केली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube