Download App

‘तो’ व्हिडिओ सरकारचा की, पक्षाचा; सुप्रिया सुळेंचा अजितदादांना खोचक टोला

Supriya Sule यांनी अजित पवार यांनी शेअर केलेल्या व्हिडिओवरून सवाल उपस्थित केला. 'तो' व्हिडिओ सरकारचा की, पक्षाचा अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Supriya Sule On Ajit Pawar Video : अजित पवार (Ajit Pawar) यांनी शेअर केलेला व्हिडिओ हा सरकारचा होता की, पक्षाचा होता. असा सवाल सुप्रिया सुळे (Supriya Sule ) यांनी उपस्थित केला. राज्याचा अर्थसंकल्प मांडल्यानंतर विरोधकांकडून प्रचंड टीका केली जात आहे. अजित पवार यांनाही टार्गेट केले जात आहे. त्यामुळे आज स्वतः अजित पवार यांनी एक व्हिडिओ (Video) संदेश जारी करत भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच भ्रष्टाचाराचे खोटे आरोप का झाले याचंही उत्तर देऊन टाकलं. यावर शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

अजित पवार यांनी शेअर केलेला व्हिडिओ हा सरकारचा होता की, पक्षाचा होता. कारण त्यावर पक्ष चिन्ह होतं. त्यामुळे हा व्हिडिओ पदावरून केला आहे की, पक्षप्रमुख म्हणून असा सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला. तसेच मला अपेक्षा आहे. कोर्टाच्या आदेशानुसार अजित पवारांच्या टीमने व्हिडिओत घड्याळाच्या चिन्हाखाली फुटनोट टाकली असेल. असंही त्या म्हणाल्या.

Vivek Oberoi : लॉबिंगचा बळी ठरला ‘हा’ अभिनेता, कतरिनाने त्याच्यासोबत…

त्याचबरोबर यावेळी त्यांनी अजित पवारांवर जे भष्ट्राचाराचे आरोप झाले त्याच उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिले पाहिजे. माझ्या तिन्ही बहिणीवर रेड झाली होती. त्याला कोण जबाबदार आहे? महायुतीने, मोदींनी उत्तर द्यावे, महाविकास आघाडी त्याच कशाला उत्तर देणार. असं म्हणत देवेंद्र फडणवीसांवर देखील निशाणा साधला आहे.

काय आहे अजित पवारांचा व्हिडीओ?

काही दिवसांपूर्वी मी अर्थसंकल्प सादर केला. राज्याचा ऐतिहासिक अर्थसंकल्प मांडण्याचं भाग्य मला लाभलं याचा मला अभिमान आहे. आता या अर्थसंकल्पावर अकारण टीका केली जात आहे. काहींनी अर्थसंकल्पाला लबाडा घरचं आवतण म्हणून हिणवलं आहे. मला इतकंच सांगायचं आहे की या लोकांमध्ये आणि माझ्यात एकच फरक आहे. तो म्हणजे त्यांना फक्त राजकारण करायचंय पण तुमचा दादा काम करणारा आहे असे अजित पवार म्हणाले.

सहकलाकारासाठी Tiger Shroff चा मदतीचा हात; 10 वर्षांपुर्वी केलं होतं एकत्र काम

भ्रष्टाचाराचे आरोप झाले पण सिद्ध झाले नाही

माझ्या कामांची यादी खूप मोठी आहे. ज्यांना आठवत नसेल त्यांनी जरुर माहिती घ्यावी की या विकासकामांची सुरुवात कुणी केली. या सगळ्यात तुम्हाला तुमचा दादाच दिसेल याची मला खात्री आहे. जो जास्त काम करतो त्यालाच जास्त त्रास सहन करावा लागतो. म्हणूनच मधल्या काळात माझ्यावर भ्रष्टाचाराचे खोटेनाटे आरोप झाले. पण यातील एकही आरोप सिद्ध झाला नाही आणि भविष्यातही कधीच होणार नाही, असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला.

माझा दोष इतकाच आहे की..

मी राज्यातील गोरगरीब जनतेला तीन सिलेंडर मोफत देण्याची घोषणा केली आहे. पण या बदल्यातही मला शिव्या शाप मिळतात. माझा दोष फक्त इतकाच आहे की मी शेतकऱ्यांची दुःखं आणि त्यांच्या वेदना समजून घेतल्या. सरकारच्या योजनांच्या माध्यमातून या वेदनांवर फुंकर घालण्याचा प्रयत्न केला असेही अजित पवार यांनी सांगितले.

follow us