Supriya Sule : राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये फूट फडल्यानंतर शरद पवार गट (Sharad Pawar आणि अजित पवार गट यांच्यात शाब्दिक चकमकी सुरू झाल्या आहेत. दोन्ही गटांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. आता उपमुख्यमंत्री अजित पवार हे शरद पवारांवर थेट हल्ले करू लागले आहेत. राष्ट्रवादीतील वयस्कर नेत्यांनी तरुणांना संधी दिली नाही, असा आरोप त्यांनी नुकताच केला. तर याआधी शरद पवारांचं वय काढलं होतं. दरम्यान, या सर्व घडामोडींवर आता खासदार सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) प्रतिक्रिया दिली आहे.
‘भारत न्याय यात्रे’वर आसाममध्ये हल्ला : वाहनांची तोडफोड, राहुल गांधी सुरक्षित
आज सुप्रिया सुळे धनकवडी येथे एका कार्यक्रमासाठी आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी आपल्या भाषणातून भाजप नेत्यांच्या कार्यशैलीचा खरपूस समाचार घेतला. सत्ता काय असते, मी ते आयुष्य अगदी जवळून बघितलं आहे. सत्तेचे एकच कारण आहे. ते म्हणजे, तुमच्या आयुष्यात चांगला बदल घडवणं, मात्र, सत्तेतील आमदार आणि खासदारांचं वागणं बघा, असा सुळे म्हणाल्या. पुढं बोलतांना सुळे म्हणाल्या, माझे वडील फार कमी बोलतात. ते कुणाला सल्ला तर देतच नाहीत. आता माझ्या वडिलांच्या मागे त्यांची बदनामी करायला अदृश्य शक्ती लागली आहे. मला ती अदृश्य शक्ती माहित नाही. पण, मुख्यमंत्री म्हणतात की, अदृश्य शक्ती महाराष्ट्र चालवते. पण, त्यांना माझं सांगण आहे की, त्यांनी राजकारण जरूर करा. पण, ते मुद्देसुद करावं. विकासाला धरून करावं, लोकाच्या भल्सासाठी करावं. आता मला सांगा, परवा रोहित पवारला ईडीची नोटीस आली. आता त्याने तुमच्या आयुष्यता काय फरक पडणार आहे? असा सवाल सुळेंनी केला.
Ayodhya : 10 मंत्रोच्चार, 10 वेळा स्नान अन् 10 दान… अशी आहे PM मोदींची दिनचर्या
तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी सत्ता असते. त्यामुळं जर मी अदृश्य शक्तीच्या ठिकाणी असते, तर मी ईडी, सीबीआय या भानगडीत पडले नसते आणि गॅसचे दर कमी केले असते, अशा शब्दात त्यांनी भाजप नेत्यांवर टीका केली.
राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर दोन्ही गटात पक्षावरून वाद संघर्ष सुरू झाला. यावरही सुळेंनी भाष्य केलं. त्या म्हणाल्या, संघर्षात एक वेगळीच मजा असते. आता हे प्रकरण न्यायालयात गेल्यानं और हम और लढेंगे. पण, माझी आई सांगायची की, आपण कोणाच्याही ताटात जेवण केले असेल ना, त्याच्या विरोधात कधीच बोलायचं नाही. ते उपकरा कधीच विसरू द्यायचे नसतात, अशा शब्दात सुळेंनी अजित पवारांना टोला लगावला.