Download App

“मी स्वतः मतं मागते, नवऱ्याला फिरवत नाही” : सुप्रिया सुळेंचा सुनेत्रा पवारांना टोला, नणंद-भावजय वाद तापला

  • Written By: Last Updated:

वडगाव : मी आता जी मतं मागते, ती मेरिटवर मागते. मत मागायला मी स्वतः जाते, सदानंद सुळेंना मत मागायला फिरवत नाही, मी एक लोकप्रतिनिधी आहे, नवऱ्याने पेपर भरायचा आणि मी पास व्हायचं, असं कॉपी करून पास नाही होणार… मै सुप्रिया सुळें हू…. खुद करुंगी, और खुद पास हुंगी, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना टोला लगावला आणि मतं मागण्यासाठी स्वतः बाहेर पडण्याचे आव्हानही दिल्याची चर्चा आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये बारामती मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून सुप्रिया सुळे यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार म्हणून सुनेत्रा पवार यांच्या नावाची चर्चा आहे. अजित पवार यांनीही त्याच उमेदवार असू शकतात याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे अजित पवार हे संपूर्ण बारामती मतदारसंघ पिंजून काढत आपलाच उमेदवार निवडून देण्याचे आवाहन करत आहे. हाच पकडून आता सुप्रिया सुळेंनी अजित पवारांवर जोरदार टीका केली.

India Maldives Conflict : आमच्याकडे भारतीय सैन्य नाहीच; मदत नाकारत मालदीवचा पुन्हा भारतविरोधी सूर 

पुण्यातील वडगाव येथे एका कार्यक्रमादरम्यान बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या,  मी आता जी मतं मागते, ती मेरिटवर मागते. मत मागायला मी जाते, सदानंद सुळेंना मत मागायला फिरवत नाही, मी एक लोकप्रतिनिधी आहे, नवऱ्याने पेपर भरायचा आणि मी पास व्हायचं, असं कॉपी करून पास नाही होणार… मै सुप्रिया सुळें हू…. खुद करुंगी, और खुद पास हुंगी, असं सुळे म्हणाल्या.

Mouni Roy : मौनी रॉयचा पांढऱ्या साडीत किलर लूक, दिलखेच अदांवर चाहते फिदा 

पुढे बोलताना सुप्रिया म्हणाल्या की, सदानंद सुळे यांनी मतदारसंघात येऊन भाषणे ठोकलेली तुम्हाला चालतील का? संसदेमध्ये नवरा जाणार की मी जाणार? नवऱ्याला संसद परिसरात परवानगी नसते. कॅन्टीनमध्ये बसावे लागते. तुम्हाला कसा खासदार पाहिजे? सदानंद सुळे चालतील का? सदानंद सुळेंनी कितीही उत्तम भाषण केलं तरी पार्लमेंटमध्ये मला तिथे जाऊन विषय मांडायचे असतात. तिथे मलाच लढायचे असते.

 

follow us

वेब स्टोरीज