Download App

‘आमदार अन् प्रकल्प पळवून स्वत:चाच विकास’, भाजपच्या विकासावर सुप्रिया सुळेंची जळजळीत टीका

  • Written By: Last Updated:

Supriya Sule : शरद पवार (Sharad Pawar) गटाच्या शिर्डीतील शिबारीत बोलतांना खासदार सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) भाजपवर (BJP) जोरदार तोंडसुख घेतलं. भाजप ही भ्रष्ट जुमला पार्टी आहे, अशी घणाघाती टीका त्यांनी केली. एवढचं नाही तर भरसभेत त्यांनी कॉंग्रेस आणि भापजच्या विकासकामांची तुलना केली. ही तुलना करतांना भाजपने आमदार पळवून, प्रकल्प पळवून फक्त स्वत:चा विकास केला, अशी टीका त्यांनी केली.

LetsUpp Special : शरद पवारांना फक्त सहा जागा; नाना पटोले, थोरात आगीशी खेळतायेत? 

शिबीरात बोलतांना सुप्रिया सुळेंनी भाजप आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या कामांची तुलना केली. त्या म्हणाल्या, तुमच्या गावात वीज कोणी आणली? तर कॉंग्रेसने…. शाळा कॉलेज, रस्ता, मोबाईल, व्हाटसअप, गुंतवणूक, एमआयडीसी, हमीभाव, दुधसंघ, बॅक कोणी आणले? त्यावर कार्यकर्त्यांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादीने आणलं, असं एकसुरात सांगितलं. कार्यकर्त्यांनी मग कॉंग्रेस राष्ट्रवादीने केलेल्या कामांची यादीच वाचली.

Sharad Pawar : ते म्हणतात ‘ये मोदी की गॅरंटी है’ पण ती काही खरी नाही; पवारांनी पाढाचं वाचला 

सुळे म्हणाल्या, महिलांचं धोरण, आयटी पार्क, पोलीस भरती, धरणं, एअरपोर्ट, आआयटी, आयआयएम, बचत गट, फळबाग योजना, एसटी बस हा सर्व विकास कॉग्रेस राष्ट्रवादीने केला. मग भाजपने दहा वर्षात केलं? असा सवाल त्यांनी केला. त्या म्हणाल्या, महागाई, बेरोजगारी, वाॉशिंग मशील, शिक्षकांवर अन्याय, जालना लाठीचार्च, प्रकल्पांची पळवापळी, आमदार खरेदी हे सगळं करून भाजपने फक्त स्वत:चा विकास केला, अशी घणाघाती टीकाही त्यांनी केली.

अंगणवाडी सेविकांच्या मुद्दावरूनही सुळेंनी सरकारवर निशाणा साधला. त्या म्हणाल्या की, राज्यातल्या अंगणवाडी सेविकांचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे. मीही अंगणवाडी सेविकांच्या आंदोलतनात सहभागी झाले. या खोके सरकारकडे जाहिराती, कार्यक्रमांसाठी पैसे आहेत. पण, अंगणवाडी सेविकांना मानधन देण्यासाठी शब्दब नाही, हे दुर्देव आहे. प्रत्येक अंगवाडी सेविकांना शब्द देते, मी तुमच्या लढ्यात सहभागी आहे. जेव्हा राज्यात राष्ट्रवादी पक्षाची सत्ता येईल तेव्हा मुख्यमंत्री पहिल्यांदा अंगणवाडी सेविकांच्या मानधना संदर्भात निर्णय घेतील, असं सुळे म्हणाल्या.

राष्ट्रवादीची सत्ता येईल तेव्हा काळ्या आईची सेवा करणाऱ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, महिला सुरक्षितता हा आपल्या सरकारचा मोठा कार्यक्रम असेल. कॉन्ट्रॅक्ट भरती रद्द करू, असं सुळे म्हणाल्या.

त्या पुढं म्हणाले, ‘मी मेट्रोच्या विकासाच्या विरोध नाही, पण तुमच्याकडे मेट्रोसाठी हजारो कोटी रुपये आहेत, मात्र, एसटी बससाठी पैसे का नाहीत? आमची सत्ता येईल तेव्हा आधी एसटी महामंडळाच्या बसेस चांगल्या करू, मग अजित दादांना काचा फुटलेल्या बसचा फोटो सभागृहात दाखवायची वेळ येणार नाही, असा टोलाही त्यानी लगावला.

भाजप ही भ्रष्ट जुमला पार्टी
सुळे म्हणाल्या, आम्ही राजकारणात सेवेसाठी आलो. भाजप ही भ्रष्ट जुमला पार्टी आहे. पन्नास खोक्यांवर एक आमदार विकाला जात असेल तर लाज वाटायला पाहिजे. दिल्लीतील अदृश्य हात महाराष्ट्राच्या विरोधात काम करत आहे. या अदृश्य हातामुळे मराठी माणसाचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळं भ्रष्ट जुमला पार्टीला हद्दपार करून. ही लढाई फक्त माझ्या वडिलांसताठी नाही, ही महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी आहे, असं सुळे म्हणाल्या.

भाजपकडून खोटी आश्वासने
सत्तेतील लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार नाही. भाजप सरकार कायम खोटी आश्वासने देत आहे. भाजपचे लोक राज्यात एक आणि केंद्रात वेगळीच भूमिका घेतात. संसदेत धनगर आरक्षणाचा मुद्दा मांडलआ तर भाजपच खासदार आरक्षण देण्यास विरोध करतात. मु्स्मिम, धनगर, मराठा, लिंगायत समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत आम्ही लढत राहू, असं सुळे म्हणाल्या.

 

 

follow us