Suraj Chavan : कोविड काळातील कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी आमदार आदित्य ठाकरेंचे विश्वासू सहकारी सूरज चव्हाण (Suraj Chavan) याला ईडीकडून काल अटक करण्यात आलीयं. अटकेनंतर आज सूरज चव्हाण याला ईडीच्या विशेष पीएमएल न्यायालयात हजर करण्यात आले आहे. यावेळी ईडीकडून सूरज चव्हाण याच्या चौकशीसाठी ईडीकडून चौकशीची मागणी करण्यात आल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली आहे. मात्र, अद्याप न्यायालयाकडून कोठडी सुनावण्यात आलेली नाही.
मागील अनेक वर्षांपासून सूरज चव्हाण शिवेसेनेत कार्यरत आहे. शिवसेनेचं सचिवपदही चव्हाणकडे आहे एवढचं नाहीतर आदित्य ठाकरे यांचे विश्वासू सहकारी म्हणूनही त्यांना ओळखलं जातं. कोरोना काळात लोकांच्या जेवणासाठी खिचडीचे कंत्राट महापालिकेकडून देण्यात आले होते. महापालिकेकडून जवळपास 50 कंपन्यांना हे कंत्राट दिलं होतं. हेच कंत्राट देतेवेळी सूरज चव्हाण याने मध्यस्थी केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.
Dhananjay Munde : मुंडे भावा-बहिणीच्या प्रेमाला आले भरते | LetsUpp Marathi
या प्रकरणी त्याच्या खात्यात 37 लाख रुपये जमा करण्यात आल्याचंही चौकशीत याआधीह समोर आलं होतं. त्यामुळे आता ईडीने अटक केल्यानंतर या घोटाळ्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का? कोणाला कसं कंत्राट मिळालं? कोणाच्या खात्यात पैसे कसे जमा केले? याची चौकशी करण्यासाठी ईडीकडून त्याच्या कोठडीची मागणी करण्यात येत असल्याचं सांगितल जातं आहे.
पेपरफुटीविरोधातील आंदोलन दडपण्याचा सरकारचा डाव, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आक्रमक
दरम्यान, मागील अनेक वर्षांपासून सूरज चव्हाण हे पक्षासाठी काम करीत असून 2019 सालच्या निवडणुकीत त्यांची महत्वाची भूमिका असल्याचं सांगितलं जात आहे. चव्हाण यांच्या अटकेनंतर आदित्य ठाकरे यांनी एक्सवर पोस्ट शेअर करीत त्यांना पाठिंबवा दर्शवला आहे. सूरज चव्हाण यांनी फुटण्यास नकार दिला असल्यानेच त्यांचा छळ केला जात असल्याचा आरोपही आदित्य ठाकरे यांनी केला आहे. अद्याप विशेष न्यायालयाकडून सूरज चव्हाण याला कोठडी सुनावण्यात आलेली नसून किती दिवस कोठडी सुनावण्यात येणार हे पाहणं महत्वाचं ठऱेल.
कोरोना काळात सूरज चव्हाण यांच्या मध्यस्थीने अनेक कंपन्यांना कामे मिळाली असा आरोप त्यांच्यावर केला जात होता. ठाकरे गटाच्या अनेक कार्यकर्त्यांना त्यांनी कामे मिळवून दिली होती. त्यांच्यावरील या आरोपांची नंतर चौकशी करण्यात आली.