पुनीत बालन यांच्या कार्याची लष्कराने घेतली दखल, मध्य कमांडने प्रशस्तीपत्रक देऊन गौरवले

  • Written By: Published:
पुनीत बालन यांच्या कार्याची लष्कराने घेतली दखल,  मध्य कमांडने  प्रशस्तीपत्रक देऊन गौरवले

पुणे : भारतीय लष्करासमवेत (Indian Army) विविध उपक्रमांमध्ये सहभागी असलेले पुण्यातील ‘पुनीत बालन ग्रुप’चे अध्यक्ष आणि युवा उद्योजक पुनीत बाल (Puneet Balan) यांचा भारतीय संरक्षण दलाच्या मध्य कमांडच्यावतीने प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला आहे. या प्रशस्तीपत्रात पुनीत बालन करीत असलेल्या कार्याचे कौतुक करण्यात आले. भविष्यातही त्यांनी असेच कार्य करून इतरांसाठी एक उदाहरण म्हणून दीपस्तंभाप्रमाणे उभे राहावे, अशी अपेक्षा व्यक्त कण्यात आली आहे.

फडणवीसांनी नेते घडवले नाहीतर चोरले; अंधारेंनी पक्षफोडी ते इमेज सगळंच काढलं 

७६व्या लष्कर दिनानिमित्त मध्य कमांड विभागाचे लेफ्टनंट जनरल एन.एस. राजा सुब्रमणी AVSM, SM, VSM (GOC ic-C मध्ये कमांड) यांच्या हस्ते पुनीत बालन यांना हे प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानीत करण्यात आले. यापूर्वीही काश्मीर खोऱ्यात भारतीय सैन्यासोबत विविध उपक्रम राबवत असल्याबद्दल सैन्य दलाचे सह सेनाध्यक्ष लेफ्टनंट जनरल बी. एस. राजू यांच्या हस्ते पुनीत बालन यांना असेल प्रशंसापत्र देऊन गौरविण्यात आले होते.

ईडीचा दणका : आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांना अटक 

भारतीय लष्कर दलासाठी आवश्यक असलेल्या अनेक सामाजिक कार्यात पुनीत बालन हे नेहमीच आघाडीवर असतात. विशेषत: काश्मीर खोऱ्यात लष्करासोबत त्यांनी विविध उपक्रम राबवले आहेत. काश्मीरमधील विद्यार्थ्यांना ज्ञानदान करण्यासाटी त्यांनी भारतीय लष्कराकडून चालवण्यात येणाऱ्या दहा शाळा चालवण्यास घेतल्या असून या सर्व शाळा बारामुल्ला, कुपवाडा, अनंतनाग, पेहलगाम, पुलवामा, शोपियान, उरी, त्रेगम, व्हेन, घुरेस या संवेदनशील भागात आहेत. याशिवाय, बारामुल्ला येथील विशेष मुलांसाठी असलेले डगर स्कूलही भारतीय लष्करासमवेत चालवण्यात येत आहे. तसेच काश्मीरमधील दहशतवादग्रस्त तरुणांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी खेळाच्या माध्यमातून प्रोत्साहन देण्याचे कामही पुनीत बालन हे सातत्याने करीत आहेत. त्यांच्या अशाच कार्याचा लष्कराने प्रशस्तीपत्रक देऊन गौरव केला आहे.

दरम्यान, सन्मानाविषयी बोलतांना पुनीत बालन म्हणाले की, अहोरात्र देशाची सेवा करणाऱ्या भारतीय सैन्याबद्दल आपल्या प्रत्येकाच्या मनात नितांत आदर, प्रेम आणि अभिमान असतो. याच लष्कराच्या मध्य कमांड विभागाने प्रशस्तीपत्रक देऊन केलेला गौरव हा माझ्यासाठी अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. लष्करासाठी सेवा म्हणून आज खारीचा वाटा उचलण्याची संधी मला मिळत आहे, हे मी माझे नशीब समजोत. ‘नेशन फर्स्ट’ हेच माझे ध्येय असल्यानं भविष्यातही भारतीय लष्करासाठी सर्वतोपरी कार्य असेच सुरू राहिलं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube