Dummy candidate against Bapu Pathare In Wadgaon Sheri : वडगाव शेरी मतदारसंघाचे (Wadgaon Sheri) उमेदवार बापूसाहेब पठारे (Bapusaheb Pathare) यांनी उमेदवारी अर्ज भरताना जोरदार शक्ती प्रदर्शन केले होते. लोकांचा मिळालेला प्रतिसाद पाहून विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. पराभव समोर दिसत असल्याने विरोधकांकडून रडीचा डाव खेळला जात आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी सुरेंद्र पठारे यांनी विरोधकांवर टीका (Surendra Pathare Criticize) केली.
वडगाव शेरी विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार बापूसाहेब तुकाराम पठारे आहेत. मात्र त्यांचेच नाव असलेल्या एका व्यक्तीने वडगाव शेरीतून उमेदवारी अर्ज (Assembly Election) भरल्यामुळे सुरेंद्र पठारे बोलत होते. सुरेंद्र पठारे म्हणाले, श्रीगोंदा येथील रहिवासी असलेल्या बापू बबन पठारे या व्यक्तीने उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पंधरा मिनिट शिल्लक असताना आपला अर्ज दाखल केला. विरोधातील उमेदवाराचा भाऊ या डमी उमेदवाराला घेऊन अर्ज दाखल करण्यासाठी आला होता.
मोठी बातमी! मनोज जरांगेंची तब्येत अचानक बिघडली, उपचार सुरू…
दरम्यान याबाबतीत आता निवडणूक आयोगाकडून दुजाभाव केला जात असल्याचा आरोप सुरेंद्र पठारे यांनी केला. सुरेंद्र पठारे म्हणाले, उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या सर्वच उमेदवारांचे ऍफीडेव्हीट निवडणूक आयोगाने जाहीर केले. मात्र, बापू बबन पठारे यांचे ऍफीडेव्हीट अद्यापही जाहीर केले नाही, असा आरोप सुरेंद्र पठारे यांनी केला. या डमी उमेदवारांनी घेतलेल्या कर्जाची नोंद नाही, त्याच्या नावे किती मालमत्ता आहे, बँक बॅलन्स किती आहे याची देखील माहिती निवडणूक आयोगाने दिली नाही.
“शरद पवार प्रगल्भ नेते पण, त्यांनी माझी नक्कल करणं..”, अजितदादांनी नेमकं काय सांगितलं?
खरंतर उमेदवारी अर्ज भरणाऱ्या उमेदवारांनी त्याची सर्व माहिती लोकांसमोर मांडली पाहिजे अशी अट आहे. मात्र या उमेदवाराच्या बाबतीत कुठलेच नियम पाळण्यात आले नाहीत. निवडणूक आयोगाच्या या कामकाजावर सुरेंद्र पठारे यांनी आक्षेप घेतला असून कुठल्याही नियमांचे पालन न करणाऱ्या बाप्पू बबन पठारे या उमेदवाराचा अर्ज रद्द करण्यात यावा अशी मागणीही त्यांनी केली.