Suresh Dhas In Jan Aakrosh Morcha In Dharashiv : बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी (Santosh Deshmukh Murder) आरोपींवर कडक कारवाईची मागणी केली (Jan Aakrosh Morcha In Dharashiv) जातेय. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याजिल्ह्यात मोर्चे निघत आहे. बीड, परभणी, पुणे, जालन्यानंतर आज वाशिम आणि धाराशिव जिल्ह्यात जनआक्रोश मोर्चा आहे. या मोर्चासाठी देशमुख कुटुंबीय धाराशिव जिल्ह्यात आलंय.संतोष देशमुख यांच्या मुलीने पुन्हा भावनिक साद घालत आरोपींवर कडक कारवाई व्हावी अन् न्याय जलद गतीने मिळावा, अशी मागणी केलीय. धाराशिवमध्ये बोलताना भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी पुन्हा एकदा हल्लाबोल केलाय.
…तरच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींवर ‘मोक्का’ टिकेल; वकील माजिद मेमन काय म्हणाले?
सुरेश धस म्हणाले की, कुत्र्यांचं पिल्लू मेलं तर आपलं मन हळहळतं. आमच्या संतोषला कोणत्या पद्धतीने मारलं तुम्ही? असा सवाल त्यांनी केलाय. सलग चार तास याचना केली, मला मारू नका. मला पाणी पाजा. धाय मोकलून रडत होता. त्याचे व्हिडिओ काढून दुसऱ्यांना दाखवले. तिकडून आका सांगत होता, बहोत अच्छे मार रहे हो. प्रतिक घुले नावाचा आरोपी म्हटला होता, संतोषने माझ्या दोन तोंडात मारल्या. त्याचे कपडे काढवून केजमध्ये धिंड काढीन. ते पण चाललं असतं. आम्ही तुमचा माज शांतचित्ताने सहज केला असता. सोमनाथच्या बाबतीत देखील हेच झालंय.
बीड : धनजंय मुंडेच्या नेटवर्कचा नायनाट करा; मकोका दाखल होताच जरांगेंची फडणवीसांकडे मोठी मागणी
ज्याने पोलीस स्टेशनला फोन करून सांगितलं की, यांची आवादा कंपनीची खंडणीची केस घेवू नका. त्या व्यक्तीला याप्रकरणातील मुख्य आरोपी करा, अशी मागणी सुरेश धस यांनी एसपी आणि एसआयटीकडे केलीय. याप्रकरणात बिनभाड्याच्या खोलीत आकाचा आका गेला पाहिजे, अशी मागणी सुरेश धस यांनी केलीय. सात जणांना मकोका लागलाय. दहा लाखांची मदत दिली. राहिलेला आठवा देखील मकोकामध्ये गेला पाहिजे, असं सुरेश धस म्हणालेत. वरचा आका 19 ऑक्टोबरला सातपुडा बंगल्यावर बैठक घेतली, तो यातला आरोपी नाही कसं काय? असं त्यांनी विचारलं. संतोषची हत्या राहिलेल्या दीड कोटीसाठी झाली असल्याचा आरोप सुरेश धस यांनी केलाय.
यावेळी सुरेश धस म्हणाले की, दादा मी सुनेत्रा पवार यांच्या गावातून बोलतोय. त्या आमच्या भगिणी आहेत. याला (धनंजय मुंडे) मंत्रिमंडळातून काढा दादा. याच्या जागी कायंदेला द्या, अशी मागणी सुरेश धस यांनी केलीय. याने आमचं वाटोळं केलंय. दुपारी माणूस मारलाय. एकट्या वाल्मिक कराडला दोष देवू नका. त्यांच्यामागे कोण आहेत, बघा असं देखील सुरेश धस म्हणालेत. हा वाद मराठा विरूद्ध ओबीसी नाही, हाके साहेब कोणाची बी उचल घेऊन काही बोलू नका, असं देखील आमदार सुरेश धस म्हणालेत.