Download App

सुरेश धसांची ‘ती’ विनंती अन् आंदोलन स्थगित, मस्साजोगमध्ये नेमकं काय घडलं?

  • Written By: Last Updated:

Suresh Dhas On Aannatyag Aandolan Of Massajog : मस्साजोग (Massajog) ग्रामस्थ आणि संतोष देशमुख यांचं कुटुंबाने अन्नत्याग आंदोलन केलंय. अनेकांनी पाणी देखील त्याग केलंय. मुख्यमंत्र्‍यांनी या खटल्यात बाजू मांडण्यासाठी उज्ज्वल निकम यांची नियुक्ती (Santosh Deshmukh Murder) केली. ही मागणी संतोष देशमुख यांच्या कुटुंबासोबत संपूर्ण महाराष्ट्राची होती, ती पू्र्ण केली. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार आमदार आमदार सुरेश धस यांनी (Suresh Dhas) मानल्या आहेत. ते मस्साजोगमधून बोलत होते.

माध्यमांशी बोलताना सुरेश धस म्हणाले की, दोन दिवस मस्साजोगकरांचे क्लेषदायक गेलेत. खरोखर संतोष देशमुख यांच्या बाबतीत इनामदारी राखण्याचं काम राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलंय. त्यामुळे पुन्हा असं क्लेषकारक आंदोलन करण्याची वेळ येणार नाही, असा शब्द सुरेश धस यांनी संतोष देशमुख यांचं कुटुंब आणि मस्साजोगकरांना दिलाय. त्यानंतर मस्साजोगकरांनी आंदोलन स्थगित केलंय.  यावेळी खासदार बजरंग सोनवणे देखील उपस्थित होते.

VIDEO : ‘माझ्या आनंदावर विरजण…’ त्र्यंबकेश्वरमधील कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाही; प्राजक्ताने सांगितलं…

संतोष देशमुख यांना हत्येनंतर फिरवण्यात आले, त्याची आणि डॉक्टर वायभासे यांची चौकशी करावी, अशी मागणी देखील सुरेश धस यांनी केलीय. हे दोन दिवस अत्यंत वेदनादायी होती. क्लेषकारक आंदोलन तात्पुरतं स्थगित करावं, अशी विनंती सुरेश धस यांनी केली आहे. सरकारी वकिलाची नियुक्ती ही प्रक्रियेनंतर केली जाते.

दोन दिवस क्लेषकारक आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन सुरू होण्याअगोदर निवेदन दिलं होतं. एक मागणी फक्त मला आणि धनंजयला माहित आहे. ती मागणी मीडियासमोर सांगितलेली नाही. ती देखील मुख्यमंत्र्‍यांनी मान्य केलीय. कायदेशीर काही बाबीत सल्ला घ्यावा लागतो, सरसकट सगळ्यांनाच आरोपी करा म्हणण्यात आपली देखील चूक होता कामा नये. एसआयटी स्थापन झालीय, ती सीआयडीची आहे, असं सुरेश धस यांनी म्हटलंय.

50 लाख डॉलर्स द्या अन् अमेरिकचे नागरिक व्हा…डोनाल्ड ट्रम्पची ‘खास’ योजना

या प्रकरणातील आरोपी वाशीच्या जंगलातून पळून गेल्याचं म्हटलं जातंय. त्यांना सहआरोपी करणं योग्य ठरनार नाही. सहआरोपी केल्यास मुख्य आरोपींना त्याचा लाभ होऊ नये. त्यांच्यावर स्वतंत्र मकोका लागावा, अशी मागणी देखील आमदार सुरेश धस यांनी केलीय.

 

follow us