Download App

Sushama Andhare : हे निकाल ‘मोदी हैं तो मुमकिन हैं’, म्हणणाऱ्यांसाठी चपराक

Sushama Andhare On Karnataka Election : कर्नाटक निवडणुकीत मतमोजणीला (Karnataka Election Result 2023) आज सकाळपासून सुरुवात झाली होती. या निवडणुकीत काँग्रेसला (Congress) मोठी आघाडी मिळाली आहे. तर भाजपला (BJP)अनेक ठिकाणी परभवाला सामोरं जावं लागलं. भाजप सरकारमधील अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागल्यानं भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. मतमोजणीला सुरूवात झाल्यानंतर सुरूवातीपासून कॉंग्रेस (Congress) आघाडीवर असल्याचं दिसत होतं. दरम्यान, आता कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे.

यावर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अंधारे म्हणाल्या,’हे निकाल देशभरात मोदी है तो मुमकिन हैं , असं म्हणणाऱ्यांसाठी चपराक आहे. मागील नऊ वर्षात मोदींनी प्रचंड नकारात्मकतेच हेट पॉलिटिक्स पसरवलं आहे. त्याला लोक कंटाळलेले आहे. बेरोजगारी, महागाई याचा ग्रोथ रेट पाहता कर्नाटकमधील जनता सुजाण आहे. दक्षिण भारतीय प्रगत विचारधारेचे आहे. आणि या येणाऱ्या निकालाचा फायदा आणि नवी ऊर्जा येणाऱ्या काळात महारष्ट्रात पाहायला मिळेल.

Karnataka Election : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्वच उमेदवारांचा उडाला धुव्वा

त्याचबरोबर पुढे त्या असं देखील म्हणाले की, ज्या राहुल गांधीची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न, त्यांच्यासोबत नेहरू, गांधी त्यांच्या सगळ्या परिवाराची इमेज खराब करण्याचा प्रयत्न भाजपाकडून सातत्याने झाला. परंतु ज्या भाजपा स्लीपर सेलने राहुल गांधी यांना पप्पू ठरविण्याचे प्रयत्न केले. तो पप्पू सगळ्याच बाप निघाला, पप्पू सिर्फ पास नही हुआ, पप्पू मेरीट मे आ रहा है.

Karnataka Election : भाजपला धक्का! पिछाडीवर असलेले महाराष्ट्राचे प्रभारी सी. टी. रवी दवाखान्यात

तसेच धर्माच्या नावाने मत मागणे, ही भाजपची फार जुनी सवय आहे. जेव्हा भाजप वेगवेगळ्या आघाडीवर अपयशी ठरते , तेव्हा तेव्हा भाजप महापुरुषांच्या फोटो आड लपते. जशी महाराष्ट्रामध्ये सावरकर गौरव यात्रा काढण्याचा प्रयत्न झाला. तसा कर्नाटकात हनुमानावरून राजकारण करण्याचा प्रयत्न भाजपने केला. अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली आहे.

Tags

follow us