Download App

Sushama Andhare : सत्तेपेक्षा देश मोठा ही देवेंद्रभाऊंना झालेली उपरती, अजितदादांना सत्तेत घेतांना विवेक कुठे होता?

  • Written By: Last Updated:

Sushama Andhare On Devendra Fadanvis : राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक (Nawab Malik) यांनी तुरुंगातून बाहेर आल्यानंतर आज पहिल्याच दिवशी विधिमंडळाच्या अधिवेशनाला हजेरी लावली. ते सत्ताधाऱ्यांच्या बाकावर बसले. त्यामुळे महायुतीतील भाजपची चांगलीच अडचण झाली. याच मुद्यावरून विरोधकांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना लक्ष्य केले होते. यानंतर फडणवीसांनी अजित पवारांना पत्र लिहिले. मलिकांना महायुतीची भाग करणं योग्य होणार नाही, असं त्यांनी पत्रात लिहिलं. त्यावरून आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushama Andhare) यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली.


सत्तेपेक्षा देश मोठा असतो, ही देवेंद्र भाऊंना झालेली उपरती ते पत्रात लिहिताहेत. पण, मुळात अजित दादांवर 70 हजार कोटींच्या घोटाळ्यांचे आरोप करून 48 तासांतच त्यांना सत्तेत सामावून घेणाऱ्या फडणवीसांना देश मोठा वाटला नाही का, असा खोचक सवाल त्यांनी केली.

सुषमा अंधारेंनी एक व्हिडिओ ट्वीट केला. त्यात त्याम्हणतात की नवाब मलिक यांना महायुतीत घेणं योग्य ठरणार नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना पत्र लिहिल्याचे समजतं. मलिकांना सामावून घेऊ नये, असे ते म्हणाले. हा सर्व मजेशीर भाग आहे. आजच्या एकूण घडामोडी पाहता देवेंद्रजीं ज्या प्रकारे ट्रोल झाले आणि महाराष्ट्राला पचन झालेलं नाही. यानंतर त्यांनी ही उपरती आलेली आहे. सत्तेपेक्षा देश महत्त्वाचा असल्याचं त्यांनी पत्रात म्हटलं आहे. पण देवेंद्रजींना सत्तेपेक्षा देश मोठा आहे, असे वाटत असेल तर भाजपने आतापर्यंत ज्यांच्यावर आरोप केले त्यांना सत्तेत सोबत घेतांना हा विवेकवाद कुठं गेला होता, असा सवाल अंधारेंनी केला.

सुरुची अडारकरने बांधली पियुष रानडेसोबत लग्नगाठ, पाहा फोटो

अंधारे पुढं म्हणाल्या की, देवेंद्रजी, तुम्ही ज्या अजितदादांना पत्र लिहित आहात, त्याच अजितदादांवर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी अर्थात सन्मानीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रात येऊन ७० हजार कोटींच्या सिंचन घोटाळा आणि बॅंक घोटाळ्याचे आरोप केले होते.एवढा गंभीर आरोप झाल्यानंतरही 48 तासांत त्यांना सत्तेत घेणं तुमच्या नैतिकतेत बसलं होतं का आणि तेव्हा सत्तेपेक्षा देश मोठा हे तत्वज्ञान तुम्हाला का सुचलं नाही? असा सवाल केला.

अजितदादांना सत्तेत सामावून घेणे चुकीचे आहे, असे पत्र तुम्ही भाजपच्या कोणत्या नेत्याला लिहिणार? असा बोचरी टीकाही केली.

फडणवीस यांचे अजित पवारांना पत्र

नवाब मलिक यांनी आज विधानसभा परिसरात येऊन कामकाजात सहभाग घेतला. विधानसभेचे सदस्य म्हणून त्यांना हा अधिकार आहे. त्यांच्याशी आमचे कोणतेही वैयक्तिक शत्रुत्व किंवा पूर्वग्रह नाही, मात्र त्यांच्यावर ज्या प्रकारचे आरोप झाले आहेत ते पाहता त्यांचा महायुतीत समावेश करणे योग्य होणार नाही, असे आमचे मत आहे. सत्ता येते आणि जाते. पण सत्तेपेक्षा देश महत्त्वाचा आहे, असं पत्र फडणवीसांनी पवारांना लिहिलं.

Tags

follow us