Sushma Andhare on Neelam Gorhe : ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन (Akhil Bhartiy Marathi Sahitya Sammelan) सध्या दिल्लीत सुरु आहे. या संमलेनातील ‘असे घडलो आम्ही’ या कार्यक्रमात बोतलांना शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी मोठा आरोप केला. ठाकरेंच्या शिवसेनेत (UBT) दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं, असा खळबळजनक विधान त्यांनी केलं. त्यांच्या या दाव्यावर आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी (Sushma Andhare ) भाष्य करत गोऱ्हे यांच्यावर निशाणा साधला.
भटकंती करायला आवडतं पण, ट्रॅव्हल इन्शुरन्स घेतलाय का? जाणून घ्या फायदे..
नीलम गोऱ्हेंनी अनेक कर्तृत्ववान लोकांच्या संधी हिसकावून घेत चार वेळा आमदारकी भोगली. 18 महिने 13 त्रिकाळ त्या मातोश्रीवरच पडीक असायच्या, अशी टीका अंधारेंनी केली. तसेच नीलम गोऱ्हे हे नाव उच्चारलं की मला आठवतं, त्यांनी नेसलेल्या महागड्या लफेदार साड्या. हिरे-मोती-माणिक आणि सोन्याचे मॅचिंग नेकलेस, असं म्हणत अंधारेंनी सर्वच काढलं.
सुषमा अंधारेंनी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली. त्यात त्यांनी लिहिलं की, नीलम गोऱ्हे म्हटल्यानंतर तुम्हाला काय आठवतं.? एखादी कादंबरी, त्यांनी लिहिलेला वैचारिक ग्रंथ, ललित लेखन, कवितासंग्रह, गेला बाजार एखादा चारोळी संग्रह… त्यांची कोणती साहित्यकृती जास्त गाजली…?? हे सगळं विचारण्याचे कारण नुकत्याच झालेल्या साहित्य संमेलनामध्ये नीलम गोऱ्हे यांची एक मुलाखत झाली…!! राजकारण्यांना बोलावले ही साहित्यिकांची अपरिहार्यता आणि अगतिकता ही झाली आहे. शिवाय राजकारणी लोकांनाही स्वतःला बुद्धिजीवी म्हणून प्रमाणित करून घेण्याची ही नामी संधी असते. त्यामुळे शासकीय खर्चाने होणाऱ्या साहित्य संमेलनातून स्वतःची पाठ थोपटून घ्यायची संधी सोडतील त्या नीलम गोऱ्हे कसल्या?, अशी टीका अंधारेंनीं केली.
Aishwarya Narkar : ऐश्वर्या नारकरांचे पांढऱ्या शुभ्र साडीतील अप्रतिम सौंदर्य
तर नीलम गोऱ्हे साहित्य संमेलनात गेल्या. तिथे जाऊन साहित्याचे जतन-संवर्धन यावर त्यांनी काही बोलावे हे अपेक्षितच नाही. कारण आडात असेल तर पोहऱ्यात येईल ना ? मग त्यांनी म्हटले, ‘मी पक्षात असताना, म्हणजे नीलम गोऱ्हे पक्षात असताना खूप आर्थिक व्यवहार चालायचे’. मला मोठी गंमत वाटली. मला पक्षात येऊन दोन अडीच वर्ष झालीत. नीलम गोऱ्हे त्याआधी पंचवीस-तीस वर्षे होत्या. अनेक कर्तृत्ववान लोकांच्या संधी हिसकावून घेत चार वेळा आमदारकी भोगली. 18 महिने 13 त्रिकाळ त्या मातोश्रीवरच पडीक असायच्या. मातोश्रीच्या गेटमधून कुणाला आज प्रवेश द्यायचा, कुणाला नाही द्यायचा, हे त्याच ठरवायच्या. कुणाची नियुक्ती करायची, सभा-संमेलनांना कुठे वेळ द्यायची हे ठरवणाऱ्या नीलम गोऱ्हे. आता त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जर त्या पक्षात असताना आर्थिक व्यवहार चालायचे तर स्वाभाविक आहे की नियुक्त्या, नेमणुका, निवडणुकीची तिकीट या सगळ्या प्रक्रियेत नीलम गोऱ्हे होत्या. म्हणजे हा सगळा पैसा नीलम गोऱ्हेंकडे येत असणार?, असा सवाल अंधारेंनी उपस्थित केला.
गोऱ्हेंनी निष्ठावान शिवसैनिकांना मातोश्रीपासून दूर ठेवलं…
काय केलं असेल त्यांनी एवढ्या पैशाचं? परदेशात एखादा बँक खाता असेलच की…
आज त्या बोलल्यानंतर, अनेक लोक अगदी शिंदे किंवा भाजपाकडे गेलेले सुद्धा आवर्जून फोन करून सांगत होते की गोऱ्हे वाहिनींनी कशा पद्धतीने निष्ठावान शिवसैनिकांना मातोश्रीपासून दूर ठेवण्याचे कटाक्षाने प्रयत्न केले.
पुढं त्यांनी म्हटलं की, पुण्यातले शिवसैनिक सांगतात, कशा पद्धतीने महापालिका, जिल्हा परिषदा निवडणुकांमध्ये नीलम गोऱ्हे यांचे भाजपची आर्थिक हितसंबंध जुळायचे आणि इथली शिवसेना त्यांनी कशी बापट सेना करून ठेवली. पुण्यातले बिल्डर-व्यापारी यांच्याकडे कलेक्शनला जाणारी माणसं यावर पुण्यातले शिवसैनिक अत्यंत चवीने चर्चा करतात.
नीलम गोऱ्हेंचं नाव घेतलं की मी फार प्रयत्न करते- त्यांची एखादी गाजलेली सभा आठवण्याचा.. ज्या सभेत त्यांनी अत्यंत घणाघाती भाषण केलं असेल. किंवा एखादं प्रचंड मोठा आंदोलन, ज्या आंदोलनात त्यांनी लाट्या-काठ्या खाल्या असतील.. एखादा मोठा भ्रष्टाचार जो त्यांनी प्राणपणाने लढून बाहेर काढला असेल… तर मला असं काहीच आठवत नाही. नीलम गोऱ्हे हे नाव उच्चारलं की मला आठवतं, त्यांनी नेसलेल्या महागड्या लफेदार साड्या. हिरे-मोती-माणिक आणि सोन्याचे मॅचिंग नेकलेस. त्याच्यावर तसेच कानातले डूल. साडीला मॅचिंग अशी महागडी ऐटदार पर्स. तीन-चार मोबाईल. दोन-तीन पीए.. कुणाच्या हातात मोबाईल, कोणाच्या हातात डायरी तर कुणाच्या हातात मॅडमसाठी दोन-चार हातरुमालाच्या घड्या, असं अंधारे म्हणाले.
आज एका माजी आमदाराने फोन करून सांगितले.. बाय द वे, गोऱ्हे बाईंना चार वेळा आमदारकी मिळाली म्हणजे आठ मर्सिडीज दिल्या असतील. हडपसरच्या डिस्पेन्सरीला प्रॅक्टिससाठी नीलम गोऱ्हे पीएमटीने अर्थात सिटी बसने जा ये करायच्या… पीएमटीने फिरणाऱ्या नीलम गोऱ्हे यांच्याकडे आता महागड्या गाड्या आल्या… नीलम गोऱ्हे यांचे उद्योगधंदे कोणते माहित आहेत का… मला माहित नाहीत… पण एवढी आर्थिक सुबत्ता आली कशी? , असा सवाल अंधारेंनी केला.
नीलम गोऱ्हे तुम्ही अजून कमवा… आणि मखलाशा करून अजून पद मिळवा.. पंजा पक्षाने तुमचं कर्तृत्व नसताना तुम्हाला मोठं केलंय, त्यांच्यावर बोलताना जरा तारतम्य बाळगा… इतकं खोटं लोकांना पचत नाही, असंही अंधारे म्हणाल्या.