Download App

राज ठाकरे प्रो-बीजेपी, त्यांना कोणी सिरीयसली घेत नाही; ठाकरे गटाचे टीकास्त्र

राज ठाकरेंना (Raj Thackeray) वैचारिक अधिष्ठान नसल्याने त्यांना कोणीही इतकं सीरियस घेत नाही. त्यांची राजकारणातील प्रासंगिकता संपुष्टात आलीये,

  • Written By: Last Updated:

Sushma Andhare on Raj Thackeray : राज ठाकरेंना (Raj Thackeray) वैचारिक अधिष्ठान नसल्याने त्यांना कोणीही इतकं सीरियस घेत नाही. त्यांची राजकारणातील प्रासंगिकता संपुष्टात आलीये, अशी टीका ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी (Sushma Andhare) केली. तसेच राज ठाकरे कुणावर काय बोलतात आणि त्यांच्याकडे कोण जाते, याने महाराष्ट्राच्या राजकारणात फार काही फरक पडत नाही, असे त्या म्हणाल्यात.

शर्वरीचा समुद्रकिनाऱ्यावर टायर फ्लिप वर्कआउट; ‘अल्फा’च्या एक्शन शेड्यूलसाठी तयारी सुरू! 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सकाळी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास तासभर बंद दाराआड चर्चा सुरू झाली. या भेटीचे राजकीय वर्तुळात वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. विशेषतः आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांची भेट झाल्यामुळं या भेटीला मोठं महत्व आहे. दरम्यान, सुषमा अंधारे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. राज ठाकरे- देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीविषयी विचारलं असता त्या म्हणाल्या की, राज ठाकरेंना कोणीही इतकं सीरियस घेत नाही. राज ठाकरे हे वैचारिक अधिष्ठान नसणारे आणि सतत भूमिका बदलाणारे नेते आहेत, अशी टीका त्यांनी केली.

Mitali Mayekar: रंगीबेरंगी साडीत मितालीचा मोहक लूक, चाहत्यांचे वेधले लक्ष… 

निवडणुका आल्या की राज ठाकरे प्रो -बीजेपी होतात
पुढं त्या म्हणाल्या, राज ठाकरेंची राजकारणातील प्रासंगिकता संपली आहे. त्यामुळं ते कुणावर काय बोलतात? आणि त्यांच्याकडे कोण जाते? यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात फार काही उलथापालथ होईल, असं मला वाटत नाही. महाराष्ट्रातील जनताच काय मनसेच्या पदाधिकाऱ्यांनीही आता हे माहित झालंय की, राज ठाकरे एरवी भाजपच्या विरोधात प्रचंड आक्रमक भूमिका घेतात, पण जेव्हा केव्हा निडवणुका जवळ येतात, तेव्हा आपोआपच त्यांच्या भूमिका प्रो-बीजेपी होतात, अशी टीका अंधारेंनी केली.

आता सुध्दा तुम्ही ज्या भेटीगाठी दाखवण्याचा प्रयत्न करत आहात, त्या महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने असू शकतात, असंही अंधारे म्हणाल्या.

संजय राऊत काय म्हणाले?
राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कमध्ये कॅफे खोलला आहे. तिथं लोक चहापाणी करायला येतात, असा टोला संजय राऊतांनी लगावला.

follow us