Download App

Sushma Andhare : ‘मराठा-ओबीसी वादाचा भाजपाचा डाव’; सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप

Sushma Andhare : राज्यात आरक्षणावरून मराठा समाज (Maratha Reservation) आणि ओबीसींमध्ये जोरदार संघर्ष सुरू झाल्याचे दिसून येत आहे. मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नये, सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास विरोध दर्शविला आहे. सरकार मराठा समाजाला पाठीमागील दाराने ओबीसी आरक्षण देत असल्याचे भुजबळांनी स्पष्ट सांगितले आहे. त्यावरून आता विरोधकांनी सरकारला घेरण्यास सुरुवात केली आहे. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी यानिमित्ताने भाजपावर गंभीर आरोप केला आहे. भाजप जाणीवपूर्वक मराठा आणि ओबीसीत यांच्यात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे तो त्यांनी तत्काळ थांबवावा, असे वक्तव्य अंधारे यांनी केले आहे.

Sushma Andhare : ‘पोलीस स्टेशन अन् तारीख तुम्हीच सांगा, मी अटक व्हायला तयार’ अंधारेंचे देसाईंना चॅलेंज!

राज्यातील सध्याच्या परिस्थितीवर अंधारे यांनी भाष्य केले. त्या म्हणाल्या, भुजबळ साहेबांनी काय बोलावं हा त्यांचा प्रश्न आहे. मराठा बांधवांना त्यांचा हक्क मिळाला पाहिजे पण, भाजप राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. हिंदू-मुस्लीम डाव फसला म्हणून हा नवीन डाव आहे. दुष्काळ किंवा अन्य प्रश्नांवरून राज्यातील जनतेचे लक्ष हटविण्यासाठी जातीजातीत तंटे निर्माण केले जात आहेत अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली.

भुजबळांनी आगीत तेल ओतू नये – दानवे

सरकारचे मुख्यमंत्री एक बोलत आहेत. तर सरकारचे मंत्री एक बोलत आहेत. त्यातून सरकारमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे दिसून येत आहे. सुस्पष्टपणा दिसत नाहीत. दोन बाजूला दोन तोंडे दिसत आहेत. सरकारचे तोंड दुसरीकडे आणि मंत्र्यांचे तोंड दुसरीकडे दिसत आहे. मराठा समाजाला दुसऱ्यांचा वाटा घ्यायचा नाही, अशी आंदोलनकर्त्यांची भूमिका आहे. मराठा समाजातील तरुणांवर मोठा प्रमाणात अन्याय होत आहे. म्हणून मराठा समाजाविषयी सरकार काही गोष्टी सकारात्मक करत असेल तर त्या चांगल्या आहे. सरकारमधील मंत्री विरोध करत असतील तर, मराठा समाजाचा विचार करून एकत्र यावे लागणार आहे. पण मराठा समाजातील नेतृत्व हे सर्वांना बरोबर घेऊन जाणारे आहे हे लक्षात ठेवावे, असा इशारा विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिला.

Maratha Reservation : ‘होय, मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे’ बागेश्वर बाबांनी कारणही सांगितलं

आमदार प्रकाश सोळंके हे स्वतः मनोज जरांगे यांना भेटले आहेत. दोन्ही बाजूने काही गैसमज होते ते दूर झालेले आहेत. तेथे जाऊन छगन भुजबळांनी आगीत तेल ओतण्याची गरज नव्हती. छगन भुजबळ मराठा समाजाच्याविरोधात अजेंडा राबवत असल्याचा आरोपही दानवे यांनी काल पत्रकार परिषदेत केला होता.

follow us