KCR Maharashtra Visit : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव अर्थात केसीआर आज (26 जून) महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे संपूर्ण मंत्रिमंडळ, आमदार, खासदार असणार आहेत. तब्बल 600 गाड्यांच्या ताफ्यासह केसीआर महाराष्ट्रात येणार आहेत. आषाढी एकादशीनिमित्त केसीरा पंढरपूरमध्ये विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेणार आहेत. (telangana-cm-k-chandrasekhar-rao-two-day-vsit-maharashtra-telangana-cm-k-chandrasekhar-rao-two-day-vsit-maharashtra)
दरम्यान, बीआरएसचा ताफा धाराशिव जिल्ह्यातील उमरगा येथे ब्रेक घेणार आहे. तिथे चहा, नाष्टा झाल्यानंतर या सर्वांचा पहिला मुक्काम हा सोलापूर येथे असणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार सोलापूर येथील हॉटेलमध्ये तब्बल 300 रुम या नेत्यांसाठी बुक करण्यात आल्या आहेत.
बृजभूषण सिंह यांना उच्च न्यायालयाचा मोठा झटका; कुस्ती महासंघाच्या निवडणुकीला स्थगिती
तेलंगणामध्ये सत्ता आल्यानंतर भारत राष्ट्र समिती (BRS) महाराष्ट्रामध्ये राजकीय अस्तित्व निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यासाठी केसीआर यांनी महाराष्ट्रावर (Maharashtra) लक्ष केंद्रीत केलं आहे. त्यानुसार केसीआर आपली आगामी काळातील राजकीय रणनीती आखत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर केसीआर यांच्या गळाला महाराष्ट्रातील अनेक नेते लागले आहेत.
त्यातच आज केसीआर महाराष्ट्राच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. त्यामुळे केसीआर यांच्या आजच्या दौऱ्याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. या दौऱ्यात अनेक स्थानिक नेते प्रवेश करण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे. केसीआर आज पंढरपूरमध्ये दाखल होणार आहेत. याचवेळी राष्ट्रवादीचे नेते भगिरथ भालके देखील पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्यासोबतच अनेक स्थानिक नेते बीआरएसमध्ये प्रवेश करणार आहेत.
के चंद्रशेखर राव यांचे महाराष्ट्रावर लक्ष पण काँग्रेसने होम ग्राऊंडमध्येच पाडले खिंडार
बीआरएसने नुकतीच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना पक्षप्रवेशाची ऑफर दिली होती, त्याचबरोबर त्यांना मुख्यमंत्रिपदाची ऑफरही देण्यात आली, असं असलं तरी मात्र त्यावर पंकजांनी काही उत्तर दिलेली नाही. पंकजा मुंडे अनेक दिवसांपासून भाजपात नाराज असल्याच्या जोरदार चर्चा आहेत. बीआरएस पक्ष महाराष्ट्रातील विविध पक्षांमधील नाराज नेत्यांना एक करण्याचं काम करत असल्याचे पाहायला मिळत आहे.