Download App

भारत-पाक सामन्यात सर्वात मोठा जुगार, सगळी सुत्रं भाजपवाल्यांकडेच; संजय राऊत कडाडले!

भारत-पाक सामन्यात सर्वात मोठा जुगार, भाजपवाल्यांकडूनच सगळी सुत्रे हालत असल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाच खासदार संजय राऊत यांनी केलायं.

Sanjay Raut On BJP : भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यात सर्वात मोठा जुगार खेळला जात असून याची सर्व सुत्रे गुजरात आणि राजस्थानातून हलवली जात असल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलायं. दरम्यान, आशिया चॅम्पियनची घोषणा झाली असून भारत आणि पाकिस्तानमध्ये येत्या 14 सप्टेंबरला सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यावरुन संजय राऊत चांगलेच कडाडले आहेत.


पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, भारत-पाक सामना खेळवणे हा देशद्रोहच आहे. भारत-पाक सामन्याला जे समर्थन देत आहे त्यांनी आपला आंतरात्मा तपासून पाहावा. भाजपवाल्यांची सगळी मुलं अबुधाबीत सामना पाहायला जाणार आहेत, जय शाहा तर क्रिकेटचे सर्वेसर्वा आहेत. बाळासाहेब ठाकरेंनी भारत पाक सामन्याला कायम विरोध केला. एका बाजूला काश्मीरमध्ये रक्त सांडतात, दुसरीकडे क्रिकेटचा सामना खेळता लाजा वाटत नाही का? असा थेट सवाल संजय राऊत यांनी केलायं.

ते शैलीमुळे झालं पण “चहापेक्षा किटली गरम असणारे”… अजितदादांची पाठराखण करत रोहित पवारांचा रोख कुणाकडे

तसेच अरे भाजपवाल्यांनो तुम्ही तोंड तरी उघडा विरोथ करा हिंदुत्ववादी आहात ना तुम्ही? काय करतात मिंधे त्यांनी तर बाळासाहेबांचा विचार घेतलायं ना त्यांचे आमदार खासदार काय करतात? ऑपरेशन सिंदूर संपलं नाही आणि हे सामने खेळवतात. शिवसेना हे सहन करु शकत नाही अन्यथा महिला आमच्या रस्त्यावर येतील
भारत पाक सामन्यात सर्वात मोठा जुगार याची सर्व सुत्रे गुजरातमधून हलतात. राजस्थान गुजरातमधून हे चालवलं जात याची सगळी सुत्रे भाजपकडे असल्याचा आरोपही राऊत यांनी केलायं.

माझं कुंकू माझा देश अभियान राबवणार…
येत्या रविवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली माझं कुंकू माझा देश अभियान राबवण्यात येणार असून ठाकरे गटाच्या महिला आघाडीच्यावतीने हे आंदोलन करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरातून पंतप्रधान मोदींना सिंदूर पाठवण्यात येणार असल्याचंही संजय राऊतांनी सांगितलंय.

follow us