Download App

…तर महाराष्ट्राची जनता तुम्हाला लायकी दाखवून देईल; अंधारेंचं शिंदे-फडणवीसांना खुलं चॅलेंज

Sushma Andhare News : एक निवडणूक बॅलेट पेपरवर घेऊन दाखवा, मग महाराष्ट्राची जनता तुम्हाला लायकी दाखवून देईल, असं खुलं चॅलेंजच ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांना दिलं आहे. अपात्र आमदार प्रकरणावर निकाल जाहीर झाल्यानंतर शिंदे गटाच्याकडून घराणेशाहीवरुन ठाकरे गटावर टीका करण्यात आली. या टीकेनंतर सुषमा अंधारेंनी चॅलेंज दिलं आहे.

सुषमा अंधारे म्हणाल्या, अपात्र आमदार प्रकरणावरील निकालानंतर गद्दार गॅंगच्या लोकांनी जल्लोष केला, वेगवेगळी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, घराणेशाहीला आम्ही खिळ बसवतोयं, सत्याचा विजय झाला, गुणवत्तेचा विजय झाला, सरकार आता स्थिर राहील वेगैरे…पण या सर्वांना एकच विनंती आहे जर तुम्हाला घराणेशाहीवर बोलण्याचा अधिकार मिळवायचा असेल तर पहिल्यांदा श्रीकांत शिंदे यांना राजकारण सोडून गुणवत्ता सिद्ध करायला सांगा, असा खोचक सल्ला सुषमा अंधारे यांनी दिला आहे.

रफिक अन् राहुलचं अनोखं नातं! धर्माच्या सीमारेषा भेदत मुंबईत पार पडलं आंतरधर्मिय किडनी प्रत्यारोपण

तसेच श्रीकांत शिंदे यांच्यानंतर शिंदे गटातील नेते सरनाईक, गोगावले, भुसे या सर्वांना आपापल्या पोरांना राजकारण सोडून वेगळ्या क्षेत्रात गुणत्ता सिद्ध करायला सांगा. जर तुम्हाला असं वाटत असेल की, तुमच्याकडे कर्तूत्व गुणवत्ता आहे, त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेने तुम्हाला स्वीकारलं तर तो तुमचा भ्रम आहे. हा भ्रम सत्यात उतरवण्यासाठी शिंदेसाहेब फडणवीससाहेब तुम्ही एक निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या मग महाराष्ट्र तुम्हाला लायकी दाखवून देईल, असं सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.

Chhagan Bhujbal : राष्ट्रवादी अन् शिवसेनेच्या केसमध्ये फरक; बाजू भक्कम म्हणत भुजबळांनी निकालच सांगितला

लोकशाहीत मनमानी, हुकूमशाही करता येणार नाही :
लोकशाही प्रत्येक पक्षात असते. तुम्ही स्वत:ची प्रायव्हेट कंपनी समजून पाहिजे, तसे निर्णय घेऊ शकत नाहीत. तुम्ही 2019 साली भाजपसोबत निवडणूका लढवल्या. त्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं. शेवटी कालच्या निर्णयामुळे लोकशाहीचा विजय झाला, घराणेशाहीला संपवलं,, हा बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या विचारांचा विजय असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते.

follow us