Chhagan Bhujbal : राष्ट्रवादी अन् शिवसेनेच्या केसमध्ये फरक; बाजू भक्कम म्हणत भुजबळांनी निकालच सांगितला
Chhagan Bhujbal : राष्ट्रवादी अन् शिवसेनेच्या केसमध्ये थोडाफार फरक आहे. तिकडे व्हीप बदलले, असंख्य गोष्टी आहेत. आमच्या इथे ती परिस्थिती बदलली नाही. आमचा व्हीप तोच आहेत. व्हीपच्या बाबत असंख्य गोष्टी फिरत होत्या. आमची बाजू भक्कम आहे. असं म्हणत शिवसेनेनंतर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांनी (Chhagan Bhujbal) राष्ट्रवादीच्या पक्षाच्या लढाईचा निकालच सांगून टाकला आहे. ते माध्यमांशी बोलत होते.
Vaani Kapoor : वाणी कपूरला लॉटरी लागली! अजय देवगणसोबत करणार स्क्रीन शेअर, म्हणाली…
यावेळी पत्रकारांनी भुजबळ यांना प्रश्न विचारला होता की, शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल जसा शिंदेंच्या बाजूने लागला तसा राष्ट्रवादीचा निर्णय कुणाच्या बाजूने लागणार? त्यावर बोलताना भुजबळ म्हणाले की, राष्ट्रवादी अन् शिवसेनेच्या केसमध्ये थोडाफार फरक आहे. तिकडे व्हीप बदलले, असंख्य गोष्टी आहेत. आमच्या इथे ती परिस्थिती बदलली नाही. आमचा व्हीप तोच आहेत. व्हीपच्या बाबत असंख्य गोष्टी फिरत होत्या. आमची बाजू भक्कम आहे. त्यामुळे निकाल आमच्याच बाजूने लागेल. असं म्हणत भुजबळांनी विश्वास व्यक्त केला.
‘शेतकरी एक ब्रॅण्ड म्हणून जन्माला येणारे!’, ‘नवरदेव (Bsc Agri)’चा धमाकेदार ट्रेलर रिलीज
दरम्यान यावेळी शिवसेनेच्या प्रकरणावर बोलताना ते म्हणाले की, कुणीही अपात्र झालं नाही ना. ना इकडचे ना तिकडचे अपात्र झाले सगळेच विन झाले. नार्वेकर स्वतः वकील आहे. त्यांनी योग्य निर्णय दिला. उद्धव ठाकरे सर्वोच्च न्यायालय जाणार ते जाणारच दुसरी बाजू कोर्टात जातेच. तसेच लोकांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करणार. प्रतिक्रियेच्या माध्यमातून पलटवार करणार. कारण राम मंदिराचा कार्यक्रम झाला की, आचारसंहिता लागेल. त्यामुळे निवडणुकांच्या दृष्टीने प्रत्येक पक्ष आपली बाजू मांडणार असल्याचं भुजबळ म्हणाले.
तर आगामी निवडणुकांसाठी महायुतीच्या जागावाटपावर बोलताना ते म्हणाले की, जागावाटप करताना आमच्यात काही अडचण होणार नाही. सगळं व्यवस्थित होईल. सगळे नेते बसून निर्णय घेतील. जास्त आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत. सगळे आमदार अजित पवार यांच्यासोबत ही शक्ती मोजली जाईल. या सगळ्या गोष्टी मीडियात चर्चा करण्यासारख्या नाहीत. असं भुजबळ म्हणाले.