Download App

शिवसैनिक कोणाचा गमछा घालत नाहीत पण शिंदेंनी..,; अंधारेंनी भाजपच्या गमछ्यावरुन घेरलं

Sushma Andhare On Eknath Shinde : शिवसैनिक कधीच कोणाचा घालत नाही पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भाजपचा गमछा गळ्यात घातला असल्याचं म्हणत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी शिंदेंना घेरलं आहे. दरम्यान, पुण्यात सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी बोलताना सुषमा अंधारे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निकालावरुन सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली आहे.

विखे-पाचपुतेंच्या हाकेला अजितदादांची साथ; विसापूर प्रकल्पात पाणी सोडण्याचे आदेश

सुषमा अंधारे म्हणाल्या, मला माहित आहे त्यावरुन शिवसैनिका कधीच कोणत्याच पक्षाचा गमछा घातलेला नाही, पण शिंदे गटाचे आमदार तर भाजपची पालखी वाहुन घेण्यात दंग आहेत. शिंदेच्या गळ्यात कमळाचा गमछा घातल्याचं पाहिलं, पण हे सगळं द्योतक आहे शिवसेना पक्ष गुजरातवाल्यांना विकण्याचं, अशी खोचक टीका सुषमा अंधारे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे.

‘मुख्यमंत्रिपदासाठी ‘महा’कपट केलं नसतं तर’.. भाजप नेत्याचा ठाकरेंना खोचक टोला

तसेच काँग्रेसचे काही भोई एकनाथ शिंदे घेऊन गेले आहेत. नूकताच मुंबई काँग्रेसचा चेहरा मिलिंद देवरा यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. शिंदेंचे भोई ते घेऊन गेले आहेत आता कोणी अजून जाणार नाहीत, असं उत्तर सुषमा अंधारे यांनी मिलिंद देवरा यांच्या प्रवेशावर दिलं आहे. आगामी निवडणुकीसाठी अद्याप माझा मतदारसंघ ठरलेला नसून सध्या आमच्या टीमला माझी गरज असून त्यासाठी मी राज्यभर फिरुन काम केलं पाहिजे, राज्यातील कल्याण, वाशिम, अमरावती, धाराशिव, अशा कोणत्याही मतदारसंघात आमचा उमेदवार उद्धव ठाकरे म्हणून उभं राहणार असल्याचं सुषमा अंधारेंनी स्पष्ट केलं आहे.

फडणवीसांनी नेते घडवले नाहीतर चोरले…
चाणक्य नेते घडवत असतात, जसं शरद पवार, बाळासाहेब ठाकरे हे नेते घडले आहेत. पण देवेंद्र फडणवीस यांनी तर दुसऱ्यांचेच नेते चोरले आहेत. वेगवेगळ्या पक्षातून लोकं चोरुन आणून ते पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. देवेंद्र फडणवीसांना दरवेळी ऑफर द्यावीच लागते तशीच ऑफर त्यांनी सुशीलकुमार शिंदे यांना दिली आहे. पण निष्ठावंतांना ऑफर देण्यासाठी ताकद आणि हिंमत लागत असल्याचं सुषमा अंधारेंनी स्पष्ट केलं आहे.

follow us