विखे-पाचपुतेंच्या हाकेला अजितदादांची साथ; विसापूर प्रकल्पात पाणी सोडण्याचे आदेश
Ahmednagar News : कुकडी प्रकल्पाचे मागील 15 डिसेंबरपासून आवर्तन सुरु आहे. कुकडीतून विसापुर प्रकल्पातही 21 जानेवारीपासून पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती खासदार डाॅ. सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी दिली. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सध्या वेग आल्याचं पाहायला मिळत आहे. अहमदनगर दक्षिणचे खासदार सुजय विखे पाटील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने मतदारसंघात आयोजित कार्यक्रमांना खासदार विखे हजेरी लावत आहेत. या कार्यक्रमात सुजय विखे यांनी केलेल्या विकास कामांचा पाढाच ते वाचून दाखवत आहेत.
याप्रश्नी पालकमंत्री राधाकृष्ण विखे व आमदार बबनराव पाचपुते यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्यामुळे विसापूरला पाणी सोडण्याचे आदेश अजित पवार यांनी दिल्याने विखे आणि पाचपुते यांची शिष्टाई कामी आल्याची माहिती दिली आहे.
मुंबईत मोकाट रेडे, बंदोबस्त करण्याची योजना सुचवा; फडणवीसांकडून ठाकरे-राऊतांना ‘रेड्या’ची उपमा
विखे यांनी बोलताना विसापूरच्या पाण्याबाबत शेतकऱ्यांची मागणी आहे. पाणी सोडण्याबाबत आमदार बबनराव पाचपुते हे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या वेळोवेळी संपर्कात होते. विसापूर धरणात पाणी सोडण्याबाबत दोघांनीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा केली. त्यानुसार उपमुख्यमंत्री अजित पवार पवार यांनी येत्या 21 जानेवारीपासून कुकडीच्या सुरु असणाऱ्या आवर्तनातून विसापुर प्रकल्पात पाणी सोडण्याचे आदेश दिले.
‘मुख्यमंत्र्यांनी तुमच्यासारखे घरकोंबडा बनून राहायचे का?’ भाजप आमदाराचा ठाकरेंना खोचक सवाल
21 ते 23 जानेवारी दरम्यान 300 दशलक्ष घनफूट पाणी विसापुरमध्ये सोडण्यात येणार असून त्यानंतर ते लाभधारकांना आवर्तनाद्वारे देण्यात येईल. त्यामुळे त्याभागातील शेतीचा पाणी प्रश्नही मिटण्यास मदत होणार असल्याचे सांगत विसापूर धरणाखालील घारगाव, बेलवंडी, लोणी व्यंकनाथ, चिंभळा, हंगेवाडी , शिरसगाव बोडखा, पिसोरे या गावांसह लाभधारक गावातील शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.