Sushma Andhare News : गृहमंत्री फडणवीस हे सध्या खुर्ची सांभाळण्यात व्यस्त आहेत, ते गृहखात्याला लागलेला कलंक आहेत, अशी जहरी टीका अंधारे यांनी केली आहे. दरम्यान, उद्धव ठाकरेंनी नागपुरातील मेळाव्यात फडणवीसांवर केलेल्या टीकेवरुन राज्यात वादंग पेटलं आहे. ठाकरेंच्या टीकेनंतर भाजप-ठाकरे गटातील नेत्यांमध्ये कलगीतुरा सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यावर आता सुषमा अंधारेंनीही फडणवीसांवर निशाणा साधला आहे. (Thackeray Group Leader Sushma Andhare critisize Dcm Devendra Fadnvis)
आशुतोष काळेंच्या निर्णयामुळे कोल्हेंची कोंडी, कोणता झेंडा हाती घेणार?
सुषमा अंधारे म्हणाल्या, महाराष्ट्रातील उद्योग राज्याबाहेर जातो हा कलंक नाही का? महिला असुरक्षित आहेत हा कलंक नाही का एवढा कलंकितपणा करूनही देवेंद्रजींना मुख्यमंत्रिपद मिळत नाही. देवेंद्र फडणवीस यांची गृहखात्यावरची पकड सुटत चालली आहे. पोलिसांना सध्या कोणतंच प्रकरण हाताळता येत नाहीये. गृहमंत्री म्हणून महाराष्ट्रातील अनेक प्रकरण सांभाळण्यात ते अपयशी ठरत आहेत. देवेंद्र फडणवीस हे गृहखात्याला लागलेले कलंक असल्याचं त्या म्हणाल्या आहेत.
तुटलेल्या जबड्याने केली बॉलिंग, बायकोला वाटले गंमत करतोय; कुंबळेनी सांगितला ‘तो’ किस्सा
तसेच उद्धव ठाकरेंनी बोलताना चूक केली असे अजिबात म्हणता येणार नाही, कलंकाला कलंक नाही तर काही अष्टगंध म्हणायचे का, असा प्रतिसवाल सुषमा अंधारे यांनी केला. समृद्धी महामार्गावरील अपघातानंतर मृतांचा अंत्यविधी सुरू असताना एक पक्ष फोडून शपथविधी केला जातो हा कंलक नाही का, एक-एक पक्ष फोडून लोकशाही धोक्यात आणली जाते हे कंलक नाही का? असे अनेक प्रतिसवाल करीत सुषमा अंधारेंनी देवेंद्र फडणवीसांना धारेवर धरलं आहे.
दरम्यान, भाजपने ठाकरे गट आणि उद्धव ठाकरे यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली. त्याला ठाकरे गटानेही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख ‘कलंक’ असा केला आहे. त्यावरुन आता पुन्हा एकदा भाजप नेते आणि ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये वाद पेटणार असल्याची शक्यता आहे.