Jitendra Awhad On Shinde Group : ठाणे स्मार्ट नाहीतर ओवर स्मार्ट झालं, असल्याची जळजळीत टीका राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड(Jitendra Awhad) यांनी केली आहे. दिवाळा पहाटनिमित्त ठाण्यातील टेंभीनाका परिसरात नृत्यांगणा गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. शिंदे गटाच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी हा कार्यक्रम आयोजित केला. त्यावरुन आता जितेंद्र आव्हाडांनी बोट ठेवत टीका केली आहे. आव्हाडांना यासंदर्भातील पोस्ट एक्सवर शेअर केली आहे.
महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा दिवाळी पहाट लावणी नी साजरी केली गेली.
संस्कृती बद्दलली ठाणे स्मार्ट नाही ओवर स्मार्ट झाले https://t.co/0JOifTQMH1— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) November 12, 2023
आव्हाड पोस्टमध्ये म्हणाले, “महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा दिवाळी पहाट लावणी नी साजरी केली गेली. संस्कृती बद्दलली ठाणे स्मार्ट नाही ओवर स्मार्ट झाले” असं आव्हाड आपल्या पोस्टमध्ये म्हणाले आहेत. दिवाळी पहाट कार्यक्रमाला ठाण्यातील टेंभीनाका परिसरात प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटीलच्या डीजे शोचं आयोजन करण्यात आलं होतं. शिंदे गटाच्या नेत्या आणि माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी दिवाळी पहाट कार्यक्रम आयोजित केला होता. दिवाळी पहाटचा कार्यक्रम गौतमी पाटीलने लावणी सादर करीत गाजवला खरा पण विरोधकांनी शिंदे गटावर चांगलाच निशाणा साधल्याचं पाहायला मिळालं. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंंधारे यांनीही या कार्यक्रमाचा व्हिडिओ एक्सवर शेअर करीत जळजळीत टीका केल्याचं दिसून आलं.
Box Office : पहिल्याच दिवशी भाईजानच्या ‘टायगर-3’ चा छप्परफाड कमाई; ‘इतके’ कोटी कमवत कमबॅक
राज्यभरात काल दिवाळी सणाचा उत्साह होता. राज्यातील अनेक भागांत दिवाळी पहाटनिमित्ताने सदाबहार गाण्यांचे कार्यक्रम घेत दिवाळी पहाटचा आनंद लुटल्याचं पाहायला मिळालं. मात्र, ठाण्यातील शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी चक्क गौतमी पाटीलच्या डीजे शोचं आयोजन केल्याचं दिसून आलं. दिवाळी दिवशीच सकाळपासून टेंभीनाका परिसरात गौतमी पाटीलचा कार्यक्रम सुरु होता. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गौतमी पाटीलचा बुके देत सत्कार केल्याचंही दिसून आलं. शिंदे गटाच्या या कृतीवरुन राज्यभरात विरोधकांकडून टीका केली जात आहे.
Horoscope Today: ‘या’ राशीच्या व्यक्तींना आज नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात!
सुषमा अंधारेंचीही टीका
ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे पोस्टमध्ये म्हणाल्या, “दिवाळी पहाटनिमित्त आम्ही पं. बिस्मिल्ला साहेबांची सनई पं. भीमसेन जोशी यांचे भक्ती गीत किंवा पद्मजा फेणानी यांचा गोड गळा हे सगळं ऐकून होतो. ठाण्यामध्ये आज उजाडलेली दिवाळी पहाट ही वंदनीय बाळासाहेबांनाच काय अवघ्या महाराष्ट्राला सुद्धा अपेक्षित नसेल.” अशी टीका अंधारे यांनी केली आहे.
पुण्यातही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत गायिका बेला शेंडे यांच्या सदाबहार गीतांचा कार्यक्रम पार पडला. यावेळी पवार कुटुंबातील इतरही सदस्य एकाच मंचावर आल्याचं आपल्याला पाहायला मिळाले. मात्र, दुसरीकडे गौतमी पाटीलच्या लावणीने दिवाळी पहाटचा कार्यक्रम घेतल्याने शिंदे गटाच्या नेत्यांवर सोशल मीडियावर अनेकांकडून टीका केली जात आहे.
दरम्यान, विरोधकांनी दिवाळी पहाट कार्यक्रमाचा व्हिडिओ शेअर केल्यानंतर अनेक ट्रोलर्सनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती नसल्याचं मत अनेकांकडून व्यक्त केलं गेलं आहे. त्यामुळे आता विरोधकांच्या या टीकेवरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमकी कोणती भूमिका घेतील हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.