Download App

मुख्यमंत्री-कृषीमंत्री कायद्याच्या तावडीतून सुटू शकत नाही

  • Written By: Last Updated:

मुंबई :’मला सविस्तर माहिती दिली गेली नाही म्हणून मी निर्णय घेतला. हे एखाद्या गुन्ह्यातील कायदेशीर कारवाई थांबवण्याचे कारण असू शकत नाही. निष्पापपणे विनवणी करून तुम्ही कायद्याच्या तावडीतून सुटू शकत नाही. नैतिकदृष्ट्या गुन्हा स्वीकारणे जबाबदारी आहे.’ अशी टीका राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कृषीमंत्री अब्दूल सत्तारांवर केली आहे.

‘मुख्यमंत्र्यांना चुकीची माहिती देऊन मुख्यमंत्र्यांकड़ून जमिनीबाबत आदेश काढून घेतलाअसं ह्या सरळ साध्या मुख्यमंत्र्यांनी मा. उच्च न्यायालयाला लिहून दिलं.आता त्यांनी आदेश रद्द केला आहे.हे देखिल NIT ला कळलेले नाही.अजून जमिनीचा ताबा ज्यांचा ताबा रद्द करण्यात आला आहे त्यांच्याकडेच आहे.’ असं ही आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले.

कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी गायरान जमिनींमध्ये, टीईटीमध्ये घोटाळा केला असून, सरकार कारवाई करत नसल्याचा आरोप करत विरोधकांनी सभात्याग केला. त्यानंतर मंत्री अब्दुल सत्तार यांनी विरोधकांना उत्तर दिले. तुम्ही किती जमिनी हडप केल्या, असा आरोप सत्तार यांनी केलाय. त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलयं की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एनआयटी घोटाळा आणि कृषीमंत्री अब्दूल सत्तारांनी गायरान जमीन घोटाळ्यात, नैतिकदृष्ट्या गुन्हा स्वीकारला नसून ते यावर फक्त निष्पाप असल्यासारखे कारणं देतात.

Tags

follow us