मुंबई : मी लोकसभेची निवडणूक हरल्यानंतर खूप कष्ट केले, त्यानंतर मी खासदार झालो, माझं स्वप्न पूर्ण झालं होतं, त्याक्षणी माझ्या मनात सर्व काही भरुन आलं आणि त्या फ्लोमध्ये मी वडीलांचे आशिर्वाद घेऊन त्यांना कडकडून मिठी मारल्याचं संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितलं आहे. एका मुलाखतीदरम्यान सांगताना संभाजीराजे भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.
निवडणूक हरलो तेव्हा मला खूप वाईट वाटलं होतं, शिवशाहुंचा वंशज निवडणुकीत हरतो या भावनेतून मी निराश झालो होतो, त्यानंतर मला सांगण्यात आलं की, शिवरायांच्या आयुष्यातही किती संघर्ष होता, त्यांच्याही आयुष्यात विजय पराजय आला होता, तरीह ते डगमगले नाहीत.
Sambhaji Raje : संभाजीराजे 2024 च्या तयारीला, पदाधिकाऱ्यांची निवड करत रणशिंग फुंकले
तुम्हांला नव्या राजवाड्याचं वंशज व्हायचं की महाराष्ट्राचं व्हायचं त्यानंतर मराठा चळवळ, बहुजन समाजाला न्याय देण्यासाठी मी बाहेर पडलो होतो, त्यानंतर मला बोलून खासदारकी देणं हे म्हणजे कष्टाचं फळ असल्याचंही ते म्हणाले आहेत. मी शिवशाहुंचा वंशज मी का हरणार नाही. पुन्हा नव्या जोमाने जिल्ह्यासह राज्यात मी फिरलो, कष्ट घेतले. त्यानंतर मी खासदार झाल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. वडीलांप्रती एक प्रकारची आदरयुक्त भीती होती. वडील माझ्यासाठी विशेष आहेत.
शिक्षणासाठी मला राजकोटला जावं लागत होतं. माझ्या आजोबांची इच्छा होती की मी राजकोटच्या शाळेत शिकावं. राजकोटला मी 1977-78 साली शिकत होतो. त्यावेळी वडील मला राजकोटला सोडवण्यासाठी येत असतं. वडील सोडून गेल्यानंतर वडील काय आहेत हे मला समजायचं तेव्हाही मी रडायचो. त्यानंतर घरी आल्यानंतर मी त्यांना मिठी मारत असायचो, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
Prakash Ambedkar यांनीही हात झटकले : शिंदे-ठाकरे भांडणात मी पडणार नाही!
दरम्यान, मोठ्या कष्टाने स्वत: मला बोलवून घेत खासदारकी देणं म्हणजे मोठी संधी होती. खासदार झाल्यानंतर मी गहिवरलो आणि वडीलांचे आशिर्वाद घेण्यास गेलो तेव्हा मी त्यांना कडकडून मिठी मारली होती, त्यावेळी मी भावूक झाल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
खासदार झाल्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी आपल्या स्वराज्य संघटनेची स्थापना केली असून मराठा आरक्षण, बहुजनांच्या हक्कांच्या प्रश्नांसाठी त्यांचा लढा सुरु असल्याचं दिसून येत आहे. आगामी काळात स्वराज्य संघटना निवडणुकांमध्येही सहभागी होणार असल्याचं संभाजीराजे छत्रपती यांनी स्पष्ट केलं होतं.