Pune By Election: उद्धव ठाकरेंशी काय बोलणं झालं हे तुम्हाला कशाला सांगू ; पंकजा मुंडे स्पष्टच बोलल्या…

  • Written By: Published:
Pune By Election: उद्धव ठाकरेंशी काय बोलणं झालं हे तुम्हाला कशाला सांगू ; पंकजा मुंडे स्पष्टच बोलल्या…

पुणे : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावर दिलेल्या निकालानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. यावर अनेक राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

दरम्यान, भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी देखील यावर आपली प्रतिक्रिया देत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्या चिंचवडच्या भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांच्या प्रचारासाठी आल्या होत्या यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

पंकजा मुंडे म्हणाल्या, मी या सगळ्या राजकीय परिस्थितीकडे नेहमीच कुतूहलाने पाहिलं आहे. मी जेव्हा बोलते तेव्हा व्यासपीठ कोणतं त्याच्यावर अवलंबून असतं. माझे प्रत्येकाशी खूप वैयक्तिक आणि जिव्हाळ्याचे संबंध आहेत. पण मला एवढचं म्हणायचे की, आत्ता जो काळ आहे तो काळ सर्वांसाठी कसोशीचा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक कार्यकर्ता पक्षाचा नेतृत्व करू शकतो हे नवीन मेसेज दिला आहे. हा मेसेज यशस्वी करणं आणि त्यांच्यासोबत असणारे सर्व लोक निवडून आणणं. ही कामगिरी करण्याची त्यांच्यासमोर संधी आहे. सत्तेच्या माध्यमातून लोकांची सेवा करण्याची त्यांच्याकडे संधी आहे, असं मत पंकजा यांनी मांडलं.

दुसरीकडे, उद्धव ठाकरे यांच्यासमोर शिवसेना पक्षाचे नाव नसताना पक्ष उभा करणे हा मोठा प्रश्न आहे. त्या प्रश्नांचे उत्तर ते शोधतील आणि पुढे जातील. त्यामुळे ठाकरे आणि शिंदे हे दोघेही माझ्यासाठी पुढच्या काळात कुतूहलाचा विषय असल्याचे पंकजा म्हणाल्या.

दरम्यान, बहीण म्हणून आपण उद्धव ठाकरे यांच्याशी बोलला आहात का? असा प्रश्न माध्यम प्रतिनिधींनी पंकजा यांना विचारला असता त्या म्हणाल्या, जे बहीण म्हणून बोलायचं आहे ते तुमच्यासमोर कशाला सांगू? ‘ असा सवालही त्यांनी केला. तर उद्धव ठाकरे यांना सल्ला द्यावा इतकी मी मोठी नाही. मी सगळ्यांची लहान बहीण आहे. असंही त्या म्हणाल्या.

Chhattisgarh Congress ED Raids: 8 वर्षांत ईडीने 3 हजारांहून अधिक छापे, लक्ष्य फक्त विरोधक, काँग्रेस म्हणाले आम्ही सत्तेत आलो तर… 

पुढे त्या म्हणाल्या की, चिंचवड आणि कसब्याची पोटनिवडणूक बिनविरोध व्हायला पाहिजे होती.मात्र, आता कुणी निवडणुकीच्या रिंगणात उभे राहायचं किंवा नाही राहायचं हा विषय आता मागे पडला आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी सगळ्यांची इच्छा होती पण आता लोक रिंगणात उतरले आहेत तर लढाई होईल. निकालानंतर स्पष्ट होईलच कुणाचं म्हणणं लोकांच्या मनामध्ये घर करत आहे’, असे मत पंकजा यांनी व्यक्त केले.

आजारी गिरीश बापट यांना प्रचारात का उतरवलं ?

40 स्टार प्रचारक भाजपकडे असताना देखील आजारी गिरीश बापट यांना प्रचारात उतरवलं गेलं यावर देखील पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘भाजपकडे जास्त स्टार प्रचारक आहेत त्याला आता आपण काय करणार. बापट साहेब हे सीनियर नेता आहेत. पण त्यांचा आशीर्वाद त्या निवडणुकीसाठी आवश्यक असेल असं पक्षाला वाटलं असेल आणि बापट साहेबांना ते करावसं वाटलं तर त्यात काही हरकत असण्याचे कारण नाही’. असं मत पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube