Sharad Pawar : उद्धव ठाकरे, मी अन् खर्गे बसून ठरवू! अप्रत्यक्षपणे राऊतांना दिला ‘शांत राहण्याचा’ सल्ला

काही दिवसाआधी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांची सिल्व्हर ओक या निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीत आगामी लोकसभेसाठी 16-16-16 चा फॉर्म्युला ठरवण्यात आल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, संजय राऊत (Sanjay Raut) शिवसेना 19 जागांवर लोकसभा निवडणूक लढवेल, असं वारंवार सांगत आहेत. त्यामुळं आगामी काळात जागा वाटपावरून मविआ बिघाडी […]

FIR Against Ex MD Of BharatPe, Family For Allegedly Defrauding The Fintech Of ₹81 Crore (15)

FIR Against Ex MD Of BharatPe, Family For Allegedly Defrauding The Fintech Of ₹81 Crore (15)

काही दिवसाआधी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांची सिल्व्हर ओक या निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीत आगामी लोकसभेसाठी 16-16-16 चा फॉर्म्युला ठरवण्यात आल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, संजय राऊत (Sanjay Raut) शिवसेना 19 जागांवर लोकसभा निवडणूक लढवेल, असं वारंवार सांगत आहेत. त्यामुळं आगामी काळात जागा वाटपावरून मविआ बिघाडी निर्माण होण्याची शक्यता असल्यचां बोलल्या जात आहे. दरम्यान, शरद पवार यांनी याबाबत भाष्य केलं. जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला नसल्याचं त्यांनी सांगितलं.

पुण्यात माध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले, महाविकास आघाडीच्या बैठकीत कोणत्याही प्रकारची जागा वाटपासंदर्भात चर्चा झाली नाही. मीडियामध्ये ज्या बातत्या येत आहेत, त्यात जराही तथ्य नाही. आगामी निवडणुका एकत्र लढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तीन पक्षांतील प्रत्येकी दोन सदस्य जागावाटपावर चर्चा करतील. काही अडचण असेल तर उद्धव ठाकरे, मी आणि मल्लिकार्जुन चर्चा करू. महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत. मविआत क्रमांक एकचा पक्ष कोण आणि दोन क्रमांकाचा पक्ष कोण, याला महत्त्व नाही. सर्व पक्ष महत्त्वाचे असल्याचेही पवार म्हणाले.

The Kerala Story: ‘द केरळ स्टोरी’चा नवा विक्रम; बॉक्स ऑफिसवर जमवला 200 कोटींचा गल्ला

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2000 रुपयांची नोट चलनातून बाद करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. 2000 रुपयांच्या नोटा बँकेत बदलून घेण्यासाठी नागरिकांना 30 सप्टेंबर 2023 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्याची देशभर चर्चा होत असून विरोधकांनी सरकारच्या या निर्णयावर टीका केली. आरबीआयच्या या निर्णयावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली.

शरद पवार म्हणाले, एखाद्या लहरी माणसानं निर्णय घ्यावा, तसा हा निर्णय घेतलेला दिसतो, यापूर्वी असाच निर्णय घेतला होता. तेव्हा तर तर अनेकांचे नुकसान झालं. पुणे जिल्ह्यातील सहकारी बँकेत त्यावेळी काही प्रमाणात रोकड होती. अनेक कोटींची ही रक्कम बदलायची होती मात्र ती बदलून दिली नाही. निर्णय घ्यायचे मात्र, नंतर त्या निर्णयाची जबाबदारी न स्वीकारणे हे चुकीचे आहे. मागे नोटबंदीचा निर्णय घेतला गेल्या तेव्हा काळ पैसा बाहेर येईल, देशात चमत्कार होईल, असं सांगण्यात आलं. चमत्कार एवढाच झाला की, लोकांनी आत्महत्या केल्या, असं पवार म्हणाले.

Threat Call: “मी मुंबईत बॉम्बस्फोट करणार…”; पोलिसांना ट्विटरच्या माध्यमातून पुन्हा धमकी

जयंत पाटील यांना ईडीकडून आलेल्या नोटीशींसंदर्भात बोलतांना शरद पवार म्हणाले की, विरोधकांना त्रास देण्यासाठी ईडीचा गैरवापर होतो. आतापर्यंत राष्ट्रवादीच्या दहा लोकांना ईडीला हातीशा धरून त्रास देण्यात आला. सत्ताधारी पक्षाच्या काही अपेक्षा असतील, मात्र, त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याची आमची तयारी नाही, जो काही त्रास होईल, तो सहन करू, असा पवार म्हणाले.

Exit mobile version