Download App

Devendra Fadanvis : वर्षभर निकाल लागू नये, हे उद्धवजींच्या शिवसेनेचं धोरणं

  • Written By: Last Updated:

मुंबई : ‘कोर्टाने हे सांगितलं की, नबाम रेबियीच्या प्रकरणावर पुनर्विचार करण्यात यावा त्यासाठी राज्यातील सत्तासंघर्षावरील सुनावणी 7 न्यायमुर्तींच्या खंडपीठाकडे देण्याची मागणी संयुक्तिक नाही. मेरिटवर आम्ही पुर्ण केस एकू त्यानंतर आम्ही राज्यातील सत्तासंघर्षावरील सुनावणी 7 न्यायमुर्तींच्या खंडपीठाकडे द्यायची की नाही ते ठरवू. असं न्यायालयाने (Supreme Court) दिली.’

‘आम्हालाही वाटत होतं की, उद्धवजींची शिवसेना वेळकाढूपणा करण्यासाठी राज्यातील सत्तासंघर्षावरील सुनावणी 7 न्यायमुर्तींच्या खंडपीठाकडे देण्याची मागणी करत आहे. यावरच हा निर्णय देण्यात आली आहे. त्यामुळे आता हा वेळकाढूपणा होणार नाही. उद्धवजींच्या शिवसेनेला ही सुनावणी वर्षभर चालावी असं वाटत होतं. पण आता ही सुनावणी सलग होणार आहे. त्यामुळे जो काही निर्णय आला आहे. त्यावर आम्ही समाधानी आहोत.’ अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

Sanjay Raut : फडणवीसांच्या सभेनंतर पत्रकार शशीकांत वारीसे यांची हत्या

राज्यातील सत्तासंघर्षावर (Supreme Court)आज चौथ्या दिवशी सुनावणी न होता निकालाचे वाचन करण्यात आले. आज सकाळी साडेदहा वाजता दोन्ही गटाचे वकिल न्यायालयात हजर होते. ठाकरे गटाने हे प्रकरण सात न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे जावे, अशी मागणी केली होती. पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने ठाकरे गटाची मागणी नाकारली आहे. पुढील सुनावणी २१, २२ फेब्रुवारीला होणार आहे.

या प्रकरणी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्यासह न्या. एम. आर. शहा, न्या. कृष्ण मुरारी, न्या. हिमा कोहली आणि न्या. पी. नरसिंहा पाच न्यायमूर्तींनी ही सुनावणी (Eknath Shinde VS Uddhav Thackeray hearing in Supreme Court) पूर्ण केली हाती. या न्यायमूर्तींच्या घटनापीठाने आज सकाळी हा निकाल दिला. ठाकरे गटाचे कपिल सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी यांच्यासह पाच विधिज्ञ हजर होते. तर शिंदे गटाकडून हरीश साळवे, नीरज कौल, महेश जेठमलानी, मनिंदरसिंग यांच्यासह १० वकिल उपस्थित होते.

Tags

follow us