Manoj Jarange Patil : राज्य सरकारकडे आजची रात्र आहे, सरकारने गांभीर्याने विचार करावा असं म्हणत जर सरकारने आरक्षण दिले नाही तर 288 उमेदवार पाडू असा इशारा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी सरकारला दिलाय. त्याचबरोबर सगेसोयरेंचा अध्यादेश व इतर मागण्यांवर सरकारने निर्णय घ्यावा. अन्यथा मी पुन्हा 20 जुलै रोजी उपोषण आंदोलन करेल, असा इशाराही जरांगे यांनी दिलाय. मनोज जरांगे हे संभाजीनगरमध्ये (Sambhajinagar) आयोजित शांतता रॅलीमध्ये बोलत होते.
संभाजीनगरमधील क्रांती चौकात आयोजित सभेत बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, आजच्या रॅलीमध्ये लाखोंच्या संख्येने मराठे उपस्थित आहे आता यांचे सरकार येणार नाही. राज्य सरकारकडे आजची रात्र आहे, सरकारने गांभीर्याने विचार करावा. जर सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिला नाही तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत 288 उमेदवार पाडू असं जरांगे म्हणाले. तसेच उद्या वाखरीत रिंगण सोहळ्याला जाणार अशी घोषणा देखील यावेळी त्यांनी बोलताना केली.
पुढे बोलताना जरांगे पाटील म्हणाले, आमचा राजकारणाचा काहीच संबंध नाही . मात्र जर मराठा समाजाला आरक्षण मिळाला नाहीतर आगामी विधानसभा निवडणुकीत 288 उमेदवार उभे करायचे की पाडायचे याबाबत निर्णय घेणार आणि आरक्षणासाठी मुंबईला कधी जायचं याचा देखील निर्णय 20 जुलै रोजी घेणार असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. तसेच पुन्हा एकदा आरक्षणासाठी 20 जुलैपासून उपोषण करणार असल्याची घोषणा देखील त्यांनी यावेळी केली. आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीचे सरकार येणार नाही असं देखील पाटील म्हणाले.
तर दुसरीकडे या रॅलीमध्ये बोलताना पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. छगन भुजबळ म्हणतात मी चौथी नापास आहे मात्र समोर या तुम्हाला दाखवतो. असे आव्हान त्यांनी छगन भुजबळ यांना दिले.
PM Narendra Modi : महाराष्ट्राला जगातील आर्थिक केंद्र बनवण्याचं लक्ष्य, मोदींची मोठी घोषणा
तसेच फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब तुम्ही येवल्याच्या छगन भुजबळाच्या नादी लागून नका. ते तुमचे सगळे पक्ष बंद पडतील. छगन भुजबळ यांना राज्यात दंगल घडवायची आहे म्हणून मराठ्यांची शांतता रॅली आहे.शांततेच युद्ध कोणालाही पेलता येत नाही. असं म्हणत जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर हल्लाबोल केला.