Download App

माझ्या तीन पिढ्यांनी वीजबिल भरलं नाही; हजार रुपये दिले की….मंत्री प्रतापराव जाधव खरं बोलून गेले

Prataprao Jadhav : माझ्या तीन पिढ्यांनी शेतीच वीजबील भरलं नाही. माझ्या आजोबांनी पण नाही, माझ्या वडिलांनी पण नाही आणि मी पण वीजबील भरलं नाही.

  • Written By: Last Updated:

Prataprao Jadhav On Electricity Bill : बुलढाण्याचे एकनाथ शिंदे गटाचे (Eknath Shinde) खासदार व केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांनी एका कार्यक्रमात कृषिपंपाचे वीजबिल (Prataprao Jadhav) भरण्याबाबत एक वादग्रस्त विधान केले आहे. माझ्या तीन पिढ्यांनी वीजबिल भरले नसल्याचे मंत्री प्रतापराव जाधव यांनी जाहीरपणे सांगून टाकले आहे.

वारकऱ्यांना सर्व सोई-सुविधा मिळणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पुण्यात शब्द

बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे मंत्री झाल्याबद्दल प्रतापराव जाधव, रक्षा खडसे यांचा जाहीर सत्काराचा कार्यक्रम पार पडला. यावेळी मंत्री प्रतापराव जाधव यांनी तुफान शा‍ब्दिक फटकेबाजी केली. मी शेतकरी आहे. माझ्या तीन पिढ्यांनी शेतीच वीजबील भरलं नाही. माझ्या आजोबांनी पण नाही, माझ्या वडिलांनी पण नाही आणि मी पण वीजबील भरलं नाही. डीपी जळाली तर इंजिनियरला हजार दीड हजार रुपये दिले की झाले काम डीपी बसवून दिली जाते, असे प्रतापराव जाधव यांनी म्हटले आहे. हे विधान केल्यानंतर उपस्थितांनी टाळ्या वाजवून त्यांना दाद दिली आहे. उपस्थितांनी हा किस्सा म्हणून त्याला दाद दिली. खरे बोलले तर सख्या आईला राग येतो, असे जाधव हे बोलून गेले.

पुण्यातील नवीन विमानतळाला जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे नाव देणार, नितीन गडकरींची ग्वाही

लाखो रुपयांचे वीजबील या सरकारने माफ करण्याची हिम्मत केली आहे. आणि मोफत वीज दिली आहे. रात्री लोडशेडिंगमुळे शेतात जायला लागायचे आहे. आता दिवसा वीज तुम्हाला मिळणार आहे. खंर बोललं तरी आपल्या सख्या आईला राग येतो. शेतात वीजपंपाचे भरलेले नाही. मी शेतकरी आहे, असे ते म्हणाले. दोन सम विचारी बैल शेतीत जुंपले की शेती चांगली होते. तस सरकारचे आहे. केंद्र आणि राज्य सरकार समविचारी असले की विकास होतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रत्येक खासदारांवर, प्रत्येक खात्यांवर बारीक लक्ष असते, असेही मंत्री प्रतापराव जाधव म्हणाले.

follow us