सलग तिसऱ्यांदा खासदार झालेले प्रतापराव जाधव मंत्रिमंडळ समितीवर!
Prataprao Jadhav : बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा लोकसभेत गेलेल्या खासदार प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांची केंद्रीय मंत्रिमंडळ विशेष समितीवर विशेष निमंत्रित सदस्यपदी नियुक्ती करण्यात आलीयं. केंद्रीय राज्यमंत्री जाधव यांची नियुक्ती झाल्यानंतर शिवसेना लोकसभेतील गटनेते खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी अभिनंदन केलंय.
बिर्यानीशिवाय एकही अधिवेशन झालं नाही; परबांनी बाबाजानी दुर्राणींचा ‘तो’ किस्सा सांगितला
प्रतापराव जाधव बुलढाण्यातून सलग तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांच्यावर केंद्रीय मंत्रिमंड़ळात आयुष मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आलीयं. शिवसेनेचे केंद्र सरकारमधील एकमेव मंत्री आहेत. खासदार प्रतापराव जाधव यांच्याकडे आयुष मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे केंद्रीय राज्य मंत्रिपद (स्वतंत्र कारभार) देण्यात आलायं.
आता केंद्रीय नेतृत्वाने खासदार प्रतापराव जाधव यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवला असून त्यांची केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विशेष समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या गुंतवणूक आणि विकास या विषय समितीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, गृहमंत्री अमित शहा, भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, अर्थमंत्री श्रीमती. निर्मला सितारामन, वाणिज्य मंत्री पियूष गोयल, ग्राहक संरक्षण मंत्री प्रल्हाद जोशी, वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंग, रेल्वे मंत्री, अश्विन वैष्णव, दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, पेट्रोलियम मंत्री, हरदिप सिंग पुरी आणि अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान यांचा समावेश आहे.
अखेर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते दानवेंचं निलंबन मागे, शिवीगाळ प्रकरणात झाली होती कारवाई
दरम्यान, शिवसेना हा एनडीएमधील सर्वात जुना आणि विश्वासू मित्रपक्ष असून नुकताच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे महाराष्ट्रातून ७ खासदार निवडून आले होते.