बिर्यानीशिवाय एकही अधिवेशन झालं नाही; परबांनी बाबाजानी दुर्राणींचा ‘तो’ किस्सा सांगितला
Anil Parab : विधान परिषेदची निवडणूक राज्यात होऊ घातलीयं. विधान परिषदेच्या (Vidhan Parishad Election) 11 जागांसाठी येत्या 12 जुलै रोजी निवडणूक पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर विधान परिषदेत आज विधानपरिषदेच्या निवृत्त आमदारांच्या निरोप समारंभाचा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी बोलताना अनिल परब (Anil Parab) यांनी आमदार बाबाजानी दुर्राणी (Babajani Durrani) यांच्याबाबतचा एक किस्सा शेअर केलायं.
शेळ्या चोरीच्या संशयातून बेदम मारहाण करत एकाचा जीव घेतला; सरपंचासह तीस जणांविरुद्ध गुन्हा
अनिल परब म्हणाले, बाबाजानी दुर्राणी यांनी परभणीमध्ये नेहमीच जातीय सलोखा राखण्याच काम केलं आहे. त्यांनी सभागृहातील सर्वांवरच प्रेम केलं आहे. बाबाजानी यांची बिर्याणी खाल्ल्याशिवाय आमचं एकही अधिवेशन झालेलं नाही. बिर्यानीची संपूर्ण कहाणी ऐकण्यासाठी आम्हाला एक दिवस आधीच चर्चा करावी लागत असल्याचं अनिल परब यांनी स्पष्ट केलंय.
तसेच उद्या कोणता बोकड येणार आहे, त्यासाठी मसाला कोणता लागणार आहे? हे सर्व ऐकून दुसऱ्या दिवशी बिर्याणी खाल्ल्यानंतर छान वाटत असे, असा किस्सा अनिल परबांनी सभागृहात सांगितला आहे.
ब्रिटनच्या निवडणुकीत भारतीयांची उडी; सत्ताधारी अन् विरोधकांकडून भारतीयांना तिकीट
राज्यात विधान परिषद निवडणुकीसाठी येत्या 12 जुलै रोजी मतदान पार पडणार आहे. यामध्ये विलास पोतनीस, मनिषा कायंदे, भाई गिरकर, बाबाजानी दुर्राणी रमेश पाटील, नीलय नाईक, महादेव जानकर, रामराव पाटील, वजाहत मिर्झा निवृत्त होत आहेत. तर अनिल परब, किशोर दराडे, निरंजन डावखरे हे पुन्हा पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातून विधानपरिषदेत आले आहेत. प्रज्ञा सातव आणि शेकापचे जयंत पाटील हे विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. १२ जुलै रोजी रोजी विधानपरिषदेची निवडणूक होणार आहे.