Download App

‘…मग संकेत दूध प्यायला बारमध्ये गेला होता का?’, सुषमा अंधारेंचा बावनकुळेंना खोचक सवाल

बावनकुळे, तुम्ही म्हणता की संकेत मद्य प्यायला नव्हता. संकेतचा मित्र मद्य प्यायला होता. मग संकेत दूध प्यायला बारमध्ये गेला होता का? - अंधारे

  • Written By: Last Updated:

Sushama Andhare : रविवारी नागपुरात एका ऑडी कारने (Nagpur Audi Car Accident)भरधाव वेगात दोन कार आणि एका दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. या अपघातातील कार भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या मुलाची असल्याची माहिती समोर आली. यावरून विरोधकांनी बावनकुळे आणि सरकारला चांगलचं घेरलं. आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंन (Sushama Andhare) यावरून सडकून टीका केली.

Nagpur Hit & Run Case : अपघाताच्या आधी संकेतने दारु, बीफ कटलेट खाल्लं; सुषमा अंधारेंचा दावा 

नागपूर हिट अँड रन प्रकरणात पोलिसांच्या तपासावर प्रश्न उपस्थित करत या प्रकरणाचे वास्तव समजून घेण्यासाठी सुषमा अंधारे नागपुरात पोहोचल्या. यावेळी माध्यमांशी बोलतांना त्या म्हणाल्या की, ऑडी कारचा अपघात  झाला तेव्हा संकेत आणि त्याचे दोन मित्र कारमध्येच होते. तो गाडी चालवत नव्हता असं सांगितलं जातं. त्याने दारू प्यायली नव्हती असं म्हटलं जातंयं. बावनकुळे, तुम्ही म्हणता की संकेत मद्य प्यायला नव्हता. संकेतचा मित्र मद्य प्यायला होता. मग संकेत दूध प्यायला बारमध्ये गेला होता का? असा खोचक सवाल अंधारेंनी केला.

Malaika Arora: अभिनेत्रीच्या वडिलांनी संपवलं जीवन; टोकाचं पाऊल उचलण्यामागे कारण काय? 

पुढं त्या म्हणाल्या, संकेत लाहोरी बारमध्ये मसाले दूध प्यायला गेला होता आणि बाकी सगळे दारु प्यायला गेले होते. पण दूध पिलेल्या माणसानं अडीज कोटीच्या गाडीची चावी प्रचंड दारु पिलेल्या माणसाकडे दिली ही चूक नाही का? असा सवाल करत संकेत बावनकुळे याने मित्रांसोबत दारू पिली, बीफ खाल्ले
आणि अपघात झाल्यानंतर संकेतने पळून जाण्याचा प्रयत्न केला, असं अंधारे म्हणाल्या.

फिर्यादी सोनकांबळेंबा पोलिस संरक्षण द्यावे
पळून जाण्याच्या प्रयत्नात रामदास पेठमध्ये त्याने पुन्हा तीन गाड्या ठोकल्या त्यातील एक गाडी जितेंद्र सोनकांबळे यांची होती. तक्रार दाखल करणाऱ्या फिर्यादीवर प्रंचड दवाब आहे. जितेंद्र सोनकांबळे हे फिर्यादी आहे. ते अनुसूचित प्रवर्गात येतात. या सगळ्यात एका अल्पसंख्याक अनुसूचित जातीच्या माणसांवर दबाव टाकला जात आहे. अजूनही फिर्यादी जितेंद्र सोनकांबळे याबाबत काहीही बोलले नाहीत, मीडियासमोर आले नाहीत, मला त्यांच्या जीवाची जास्त काळजी आहे. फिर्यादी जितेंद्र सोनकांबळे यांना पोलिस संरक्षण द्यावे, असं अंधारे म्हणाल्या.

संकेतचे नाव आरोपी म्हणून वाढीव वर्ग करा
अंधारे म्हणाल्या की, आतमध्ये डीसीपी आणि पीआय यांना काही प्रश्न विचारले. तेव्हा ते म्हणाले की आमचा तपास सुरु आहे. जर तुमचा तपास सुरु आहे आणि तुम्हाला कळलं आहे की गाडी कोणाची आहे तर तुम्ही सेक्शन वाढवत का नाही ? संकेतचे नाव आरोपी म्हणून वाढवत का नाहीत ? त्यावर ते मौन आहेत. बावनकुळेंची खरोखर तपास निरपेक्ष व्हावी, अशी इच्छा असेल तर त्यांनीच डीसीपीमधून आदेश द्यावे की, संकेत बावनकुळे यांचे नाव आरोपी म्हणून  वर्ग करा अन् त्याच्यावर सेक्शन वाढवा हे सांगायला हवं, असं अंधारे म्हणाल्या.

follow us